वांद्रे कुर्ला संकुल ते आरेदरम्यान प्रवास करणारे प्रवासी आता अवघ्या अर्ध्या तासात त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचू शकणार आहेत. तसेच त्यांना या प्रवासासाठी केवळ ५० रुपये मोजावे लागणार आहेत. आरे ते बीकेसी प्रवास करण्यासाठी मुंबईकर सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर करतात. मात्र या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी असते. त्यावर तोडगा काढण्यासाठी चालू केलेली बहुप्रतीक्षित भुयारी मेट्रो लाइन ३ चा (Mumbai Metro 3) पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांसाठी खुला होणार आहे.
(हेही वाचा – BMC : कामगार नेत्यांना आचारसंहितेची भीती; दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याची समन्वय समितीच्या नेत्यांची आयुक्तांकडे मागणी)
मुंबई मेट्रो ३ चा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. गर्दीच्या वेळेत तर सहा ते सात मिनिटांनी या मार्गावर मेट्रो चालवली जाईल, असे सांगण्यात येत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे.
दररोज ९६ फेऱ्या
मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्यात १२.५ किमीच्या मार्गिकेदरम्यान एकूण १० स्थानकांचा समावेश आहे. आरे – बीकेसीदरम्यान दररोज मेट्रोच्या ९६ फेऱ्या चालवल्या जातील. दर साडेसहा मिनिटाला या मार्गिकेवर मेट्रो चालवली जाईल. या मेट्रोचा पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या मार्गिकेवरून दिवसाला साडेचार लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमआरसीने व्यक्त केली आहे. या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १० ते ५० रुपयांपर्यंतचे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.
प्रमाणपत्राची मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील १२.५ किमीच्या आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक असे सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे प्रमाणपत्र येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून आरे – बीकेसी मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. (Mumbai Metro 3)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community