Lehgaon News : विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लेहगाव येथील शेतकऱ्यांनी दिले निवेदन

122
Lehgaon News : विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लेहगाव येथील शेतकऱ्यांनी दिले निवेदन
Lehgaon News : विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लेहगाव येथील शेतकऱ्यांनी दिले निवेदन

सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान होऊनही अप्रशिक्षित सर्वेक्षकाने कमी टक्केवारी दाखविल्याने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी अरविंद तट्टे केली. नुकसानाचे कारण पिकाचे क्षेत्र जलमय होणे असताना सर्वेक्षकाने पैशांची मागणी पूर्ण न केल्याने कारण न टाकताच सही घेतल्याचा आरोप अरविंद तट्टे यांनी तक्रारीत केला. (Lehgaon News)

(हेही वाचा- Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा; भाजपा खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र)

विमा कंपनीचे सर्वेक्षक पंचनामे करताना नुकसानाचे क्षेत्र, टक्केवारी वकारण न टाकताच शेतकऱ्यांना सह्या करण्यास बाध्य करतात, असा अनेक शेतकऱ्यांनी अनुभव कथन केला आहे. सर्व माहिती मराठीत असताना कारण इंग्लिशमध्ये ‘नो लॉस’ अशा स्वरूपात नमूद केले जाते. त्यामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. यावर्षी सतत दीड महिना पाऊस बरसत असताना व तिमाही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असताना कृषी विभाग व शासन बघ्याची भूमिका घेत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.विशेष म्हणजे, २३ सप्टेंबर रोजी एका पीकविमा कंपनीच्या एजंटने पिकाचे नुकसान जास्त दाखविण्यासाठी तीन शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजारांची मागणी केल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आणि एजंटला चोप देऊन पोलिसांसमोर दम देऊन सोडून दिले. सदर घटना मोर्शी तालुक्यातील मंगरुळ भिलापूर गावात ही घटना घडली. (Lehgaon News)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.