Jammu and Kashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र दीपक बनसोडे यांना वीरमरण

227
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र दीपक बनसोडे यांना वीरमरण
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र दीपक बनसोडे यांना वीरमरण

 जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सैन्यात (Terrorist Attacks) कार्यरत महाराष्ट्राचे सुपुत्र दीपक बनसोडे (Deepak Bansode) यांना वीरमरण आले. ते बुलडाण्यातील पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दीपक बनसोडे यांच्या शहीद झाल्याची बातमी कळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पळसखेड नागो या गावावर सध्या शोककळा पसरली आहे.

(हेही वाचा – Indian Economic Service : भारतीय अर्थशास्त्रीय सेवेतील अधिकाऱ्याची कामे काय असतात? त्याला किती पगार मिळतो?)

दीपक बनसोडे (Deepak Bansode) यांचे पळसखेड नागो या मूळ गावीच लहानाचे मोठे झाले. याच गावामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. ते पाच वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. तेथे कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारामधील नौगाव सेक्टरमध्ये २२ तारखेला रात्री झालेल्या चकमकीत ते शहीद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दीपक यांची पत्नी पोलीस दलात कार्यरत आहेत. २४ सप्टेंबरला दीपक हे सुट्टीवर गावी येणार होते. मात्र त्याआधीच त्यांना वीरमरण आले. दीपक यांचे पार्थिव मुळगावी आणल्यावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. दीपक यांच्या निधनाबद्दल श्रीनगर येथील चिनार कॉर्पच्या अधिकाऱ्यांनी संवेदना व्यक्त केल्या. (Jammu and Kashmir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.