Tirupati Laddu: तिरुपती लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय!

107
Tirupati Laddu: तिरुपती लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय!Tirupati Laddu: तिरुपती लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय!
Tirupati Laddu: तिरुपती लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय!

आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराच्या प्रसादात (लाडू) प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी जगन रेड्डींवर हा आरोप केला होता. जगन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी (Tirupati Laddu) मंदिरातील प्रसाद लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

(हेही वाचा-बंडखोरी सहन केली जाणार नाही; Amit Shah यांचा इच्छुकांना सज्जड दम)

या पार्श्वभुमीवर आता ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिराने (Jagannath Puri Temple) मोठा निर्णय घेतला आहे. जगन्नाथ पुरी मंदिराला जे तूप पुरवलं जातं त्या तुपाचीही तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जगन्नाथ पुरी मंदिराचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. आम्ही याबाबत दूधसंघाला कळवलं आहे. जगन्नाथ पुरी हे कृष्णाचं पवित्र मंदिर आहे. लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी ज्या तुपाचा पुरवठा केला जातो ते शुद्ध तूपच असलं पाहिजे असं आम्ही आधीच पुरवठा करणाऱ्या दूध संघाला बजावलं आहे. मात्र तिरुपती मंदिर प्रसाद लाडू (Tirupati Laddu) प्रकरणात जी माहिती समोर आली त्यानंतर आम्ही आता तूप तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा-Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा; भाजपा खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र)

जगन्नाथ पुरी मंदिरात जो प्रसाद तयार केला जातो त्यासाठी चुलीचा आणि लाकडांचा वापर केला जातो. तसंच यातला मुख्य घटक पदार्थ हा तूप आहे. प्रसाद तयार झाल्यानंतर आधी त्याचा नैवैद्य भगवान जगन्नाथ, देवी बिमला यांना दाखवण्यात येतो. त्यानंतर या प्रसादाचा महाप्रसाद होतो. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये जशी भेसळ झाली तशी भेसळ तुपात असू नये म्हणून जे साठवून ठेवलेलं तूप आहे त्याची आणि मागवलं जाणाऱ्या तुपाची चाचणी करण्यात येणार आहे. (Tirupati Laddu)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.