खिरेश्वरपासून ८ किलोमीटर, भंडारदरा पासून ५० किलोमीटर, पुण्यापासून १६६ किलोमीटर आणि मुंबईपासून २१८ किलोमीटरच्या अंतरावर असलेला हरिश्चंद्रगड (Harishchandragad Trek) हा महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेला एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याची उंची १,४२४ मीटर एवढी आहे. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातलं ट्रेकिंगसाठी खूप लोकप्रिय असणारं ठिकाण आहे. तसंच हे भंडारदरा इथल्या पर्यटन स्थळांपैकीही एक आहे.
हा किल्ला मूळतः कलचुरी राजवटीच्या काळामध्ये सहाव्या शतकात बांधला गेला होता आणि बहुधा अकराव्या शतकात इथे विविध लेणी कोरण्यात आल्या असाव्यात. चौदाव्या शतकामध्ये चांगदेव ऋषी ठिकाणी ध्यान करत असत. पुढे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि १७४७ साली मराठ्यांनी तो ताब्यात घेतला. येथे मायक्रोलिथिक मानवी रहिवाशांचे अवशेष सापडले आहेत. याव्यतिरिक्त मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यांसारख्या अनेक पुराणांमध्ये हरिश्चंद्रगडाचे कित्येक संदर्भ आहेत. हरिश्चंद्रगडावर रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र नावाची तीन शिखरं आहेत.
(हेही वाचा – Jammu and Kashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र दीपक बनसोडे यांना वीरमरण)
हरिश्चंद्रगडावर ट्रेक करण्यासाठी चार-पाच मार्ग आहेत. त्यांपैकी काही सर्वात सोपे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत :-
- खिरेश्वरपासूनचा मार्ग
लेण्यांच्या शेजारी पाण्याची टाकी दिसते. ती वाट पुढे जुन्नर दरवाजाकडे जाते. तिथून सरळ तोलार खिंडीपर्यंत वाट जाते. तोलार खिंडीपासून काही मिनिटे चालत गेल्यावर एक खडकाचा पॅच येतो. त्यावर रेलिंग लावलेले आहे. रेलिंग चढून गेल्यावर पठारी प्रदेश लागतो. त्या पठारावर कमी घनदाट जंगले दिसतात. तिथून ७ टेकड्या पार कराव्या लागतात. २-३ तास चालल्यानंतर हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचता येतं. हे एक शिव मंदिर आहे.
त्या सात टेकड्या पार करायच्या नसतील तर एक रोमांचक छोटा मार्ग आहे. या मार्गावरून गेलं तर दोन तासांऐवजी एका तासात मंदिरापर्यंत पोहोचता येतं. पण हा मार्ग अतिशय घनदाट जंगलातून जातो. त्यामुळे तुम्ही मोठ्या ग्रुपसोबत असलात तरचं या मार्गाने जाऊ शकता.
तोलार खिंडीतून खडकाचा पॅच चढून गेल्यावर नेहमीच्या ट्रेक मार्गाने पुढे जाता येतं. त्यानंतर एका टप्प्यावर दोन मार्ग येतात. एक मार्ग उजवीकडे सात टेकड्यांमधून मंदिराकडे जातो आणि सरळ गडाच्या खाली पोहोचतो. दुसऱ्या मार्गाने गेलं तर अतिशय घनदाट जंगलातून जावं लागतं. हा मार्ग थेट सातव्या डोंगरावर पोहोचतो. (Harishchandragad Trek)
(हेही वाचा – Britannia Industry : बिस्किटं आणि मधल्या वेळचा फराळ बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीचं कुठलं उत्पादन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं?)
- बेलपाडापासूनचा मार्ग
हा तिसरा मार्ग खास हायकर्ससाठी आहे. हा मार्ग साधलेघाट मार्गे जातो. माळशेज घाटासाठी बसमध्ये चढून माळशेज-कल्याण रस्त्यावरील सावर्णे गावातून बेलपाडा या गावात जायचं. येथून पुढे साधलेघाट मार्गे जाता येतं. या मार्गाने गेल्यावर सरळ खडकाच्या पॅचवर चढावं लागतं. इथे चढण्यासाठी ग्रिप दिलेले आहेत. हे मंदिर बेलपाड्यापासून सुमारे १ किलोमीटर एवढ्या उंचीवर आहे. या मार्गाचं एकूण अंतर सुमारे १९ किलोमीटर एवढं आहे. तसा हा मार्ग फारसा लोकप्रिय नाही आणि खूप कमी वापरला जातो. ट्रेकर्सना पावसाळ्यात गाईड सोबत ठेवण्याचा आणि खूप निसरडी वाट असल्याने जपून जाण्याचा सल्ला दिला जातो.
- पाचनईपासूनचा मार्ग
हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad Trek) जाण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो जातो पाचनई गावातून. या गावात बसने किंवा खाजगी वाहनाने पोहोचता येतं. राजूर, अकोले किंवा कोतूळ या ठिकाणांहून येणाऱ्या बसेस पाचनई गावात थांबतात. कोतुलपासून पाचनई आणि कोथळेकडे दर तासाला बसेस जातात.
कोथळेपासून पाचनई हे अंतर ५ किलोमीटर एवढं आहे. स्थानिक वाहतुकीने येथे पोहोचता येतं. पाचनई गावापासून हरिश्चंद्रगड ३ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी पायी जावं लागतं. या वाटेवर शुद्ध नैसर्गिक पाण्याचा एक छोटासा तलाव आहे. असं म्हणतात की, काही वर्षांपूर्वी या तलावातून जवळच्या गावातून आलेल्या सर्व गुराखींना पाणी पुरवलं जात असे. पाचनई हे गाव डोंगराने वेढलेलं आहे आणि पावसाळ्यात तुम्हाला पायथ्यापासून पाच धबधब्यांचं दर्शन घडतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community