Oscars-2025 : ऑस्करच्या निमित्ताने वीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार जगभर आणखी जोमाने होईल – रणजित सावरकर

227
Oscars-2025 : ऑस्करच्या निमित्ताने वीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार जगभर आणखी जोमाने होईल - रणजित सावरकर
Oscars-2025 : ऑस्करच्या निमित्ताने वीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार जगभर आणखी जोमाने होईल - रणजित सावरकर

रणदीप हुड्डा यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी निवड झाली आहे. ही बातमी सर्वत्र थोड्याच वेळात व्हायरल झाली. याचा सावरकरप्रेमींना खूप आनंद झाला. या निवडीविषयी सगळीकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यासाठी रणदीप हुड्डा यांना शुभेच्छा ! चित्रपटसृष्टीतील या नामांकित पुरस्काराच्या निमित्ताने वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार जगभर आणखी जोमाने होईल. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील वीर सावरकरांचे योगदान जगाच्या कानाकोपऱ्यातील नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांत ऑस्करसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांवर समाजवादी विचारांचा पगडा दिसून आला आहे. असे असूनही भारत सरकारने वीर सावरकरांचे कार्य उलगडणाऱ्या या चित्रपटाची निवड केली, हा निश्चितच स्तुत्य निर्णय आहे , अशी भावना वीर सावरकर यांचे नातू आणि दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : सावरकर साहित्य वाचन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन)

स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे कार्य, त्यानंतर समाज प्रबोधन आणि पुढे प्रखर हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या विचारांवर संघटन असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट पडद्यावर हुबेहूब मांडण्याची किमया रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी साधली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar) या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते असलेले रणदीप हुड्डा यांनी स्वतः या चित्रपटात वीर सावरकर यांची प्रमुख भूमिका साकारली आहे.

रणदीप हुड्डा यांनी मानले आभार 

अभिनेता रणदीप हुड्डा यांचा 2024 चा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar) आगामी ऑस्कर 2025 साठी (Oscars-2025) अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे, अशी घोषणा स्वतः रणदीप हुड्डा यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी भारतीय फिल्म फेडरेशनचे आभारदेखील मानले आहे. (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मुख्य भूमिकेत रणदीप हुड्डा यांच्या सोबतच या चित्रपटात अंकिता लोखंडे, अमित सियाल, राजेश खेरा आणि मृणाल दत्त यांच्याही भूमिका आहेत. भारतीय इतिहासाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती मला करता आली, हा माझ्यासाठी सन्मान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा केलेला संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा समोर आणण्याच्या उद्देशासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, असे हुड्डा म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.