mahadji shinde chhatri स्मारकाचा काय आहे दैदिप्यमान इतिहास?

130
mahadji shinde chhatri स्मारकाचा काय आहे दैदिप्यमान इतिहास?

पुण्यातल्या वानवडी इथलं शिंदे छत्री (mahadji shinde chhatri) हे स्मारक १८व्या शतकातल्या मराठा लष्करी नेते महादजी शिंदे यांचं स्मारक आहे. महादजी शिंदे हे १७६० ते १७८० या काळात पेशव्यांच्या मराठा सैन्याचे सरसेनापती होते. हे ठिकाण इथल्या मराठा राजवटीची आठवण करून देतं. १२ फेब्रुवारी १७९४ साली या ठिकाणी महादजी शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

१७९४ साली या स्मारकाच्या आवारात फक्त एक शिवमंदिर होतं. हे मंदिर स्वतः महादजी शिंदे यांनी बांधलेलं होतं. त्याच वर्षी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्या आवारातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. १९१० साली महादजी शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या वंशजांपैकीच एकाने शिवमंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एक समाधी स्मारक म्हणून बांधली होती.

ग्वाल्हेरचे महाराजा माधोराव सिंधिया यांनी महादजी शिंदे यांच्या स्मारकाच्या आसपासच्या आवारात इमारत बांधली. ग्वाल्हेरचे सिंधिया हे महादजी शिंदे यांचे दत्तक पुत्र दौलतराव सिंधिया यांचे वंशज आहेत. म्हणून या शिंदे छत्रीची (mahadji shinde chhatri) देखभाल ग्वाल्हेरचे शिंदे देवस्थान ट्रस्ट करते.

(हेही वाचा – Kamala Harris : डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता कमला हॅरिस यांच्या कार्यालयावर गोळीबार)

शिंदे छत्री इथली वास्तुशैली

पुण्यातल्या शिंदे छत्रीचं (mahadji shinde chhatri) प्रमुख आकर्षण म्हणजे राजस्थानच्या वास्तुशैलीचं प्रतिबिंब असलेली उत्कृष्ट वास्तुकला होय. इथल्या सुंदर कोरीव कामांमुळे इमारतीच्या वास्तुकलेची भव्यता अप्रतिम दिसते. तसंच ही इमारत वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन करून बांधलेल्या संरचनेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आजतागायत हे स्मारक आपली वास्तुशिल्प रचना आणि सौंदर्य टिकवून आहे.

शिवमंदिराच्या पायरीवर सुरेख कोरीवकाम व संतांच्या मूर्ती पिवळ्या दगडात कोरलेल्या आहेत. या मंदिराचा पाया आणि गाभारा काळ्या पाषाणाने बांधलेले आहेत. छत्री सभागृहात फक्त कोरीवकाम आणि पेंटिंग्जच नाहीत तर एक गॅलरी देखील आहे. इथल्या खिडक्यांसाठी वापरलेल्या रंगीत चौकटी या इंग्रजी शैलीच्या आहेत. या सभागृहात शिंदे घराण्यातल्या सदस्यांची चित्रं आणि छायाचित्रं लावलेली आहेत.

(हेही वाचा – Dachigam National Park मध्ये काय काय प्रसिद्ध आहे?)

शिंदे छत्री स्मारकाचं नूतनीकरण

या स्मारकाकडे (mahadji shinde chhatri) अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात झालं होतं. त्याची अवस्था वाईट होती. पावसाच्या पाण्यामुळे सभागृहाच्या इमारतीवर शेवाळ जमा झालं होतं. इमारतीच्या वरच्या मजल्याला तडे गेले होते. छताचंही नुकसान झालं होतं. त्यामुळे पावसाचं पाणी हॉलमध्ये शिरून कोरीव कामांचं नुकसान झालं होतं.

पण इमारतीची सुंदर रचना आता तिच्या मूळ रूपात येत आहे. नाजूक आणि सच्छिद्र दगडांमधलं शेवाळ प्रेशर मशीन वापरून साफ केलं गेलंय. इमारतीचं छतही आता पूर्णपणे दुरुस्त झालेलं आहे. पाणी आत शिरणार नाही याची खात्री करण्यासाठी वॉटर रेपेलेंट छताची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. इमारतीच्या जीर्णोद्धाराचा पहिला टप्पा संपलेला आहे.

पुढच्या टप्प्यामध्ये जुन्या इंग्रजी शैलीतले विंडो पॅनल्स बदलून त्याजागी नवीन लावण्याची योजना आखण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शिंदे देवस्थान ट्रस्टने जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झाल्यानंतर शिंदे छत्री (mahadji shinde chhatri) इथल्या सभागृहाच्या गॅलरीमध्ये एक छोटंसं संग्रहालय उभारण्याची योजनाही आखलेली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.