Kangana Ranaut ला भाजपाने चांगलेच खडसावले; वादग्रस्त विधानापासून अंतर ठेवण्याची तंबी

178
Kangana Ranaut ला भाजपाने चांगलेच खडसावले; वादग्रस्त विधानापासून अंतर ठेवण्याची तंबी
  • प्रतिनिधी 

चित्रपट क्षेत्रात असो वा राजकारणात सतत वादग्रस्त विधानासाठी खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) प्रकाश झोतात असतात. यावेळी मात्र अगदी हरियाणा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर बोलून पक्षालाच अडचणीत आणले. मात्र भाजपा श्रेष्ठींनी खडसावल्यानंतर आपले म्हणणे मागे घेण्याची वेळ कंगनावर आली आहे. बुधवारी एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी स्वतःचे खासगी मत मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी कंगना यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले. त्या अशाप्रकारच्या विधानांसाठी अधिकृत नाहीत. आमचे या विधानाला समर्थन नाही, असे भाटिया यांनी म्हटले आहे. त्यानंतर कंगना (Kangana Ranaut) यांनीही कृषी कायद्यांबाबत आपण पक्षासोबत असल्याचे म्हणत सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आपले शब्द मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Tirupati Laddu: तिरुपती लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय!)

कंगना रणौत (Kangana Ranaut) यांनी मंगळवारी तीन कृषी कायदे परत आणण्याबाबत विधान केले होते. हे विधान करताना त्यांनी शेतकऱ्यांनीच त्यासाठी आग्रह धरावा, असेही म्हटले होते. हरियाणा विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कंगना यांचे हे विधान आल्याने पक्षातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षानेही त्यांच्या विधानापासून चार हात दूर राहणे पसंत केले.

तीन वादग्रस्त कृषी कायदे पुन्हा आणायला हवेत, या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना उपरती आली आहे. पक्षाने झापल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले आहे. दरम्यान, कंगना यांच्या विधानावर काँग्रेस, आपसह इतर विरोधी पक्षांनी भाजपावर टीका केली होती. तसेच भाजपामधील काही नेत्यांनीही कंगना यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे कंगनाने (Kangana Ranaut) कायदे परत आणण्याबाबत केलेल्या विधानानंतर यावरून वाद निर्माण होईल, असे टिप्पणीही केली होती.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा; भाजपा खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र)

वाद होणार हे माहित असूनही त्यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले होते, हे स्पष्टच आहे. यापूर्वी पक्षाने अशा विधानांपासून लांब राहण्याबाबत कंगना यांना तंबी दिली होती. कंगना (Kangana Ranaut) यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मी फक्त एक कलाकार नाही तर भाजपाची कार्यकर्ताही असल्याचे मला लक्षात ठेवायला हवे. माझी मते वैयक्तिक राहू शकत नाहीत. मला खेद वाटतो. मी माझे शब्द मागे घेत आहे. भाजपामधील काही नेत्यांनीही कंगना यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.