BMC : मुंबई महापालिकेत उपायुक्त दिघावकर, चंदा जाधव यांच्या बदल्या

8105
Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ
Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
मुंबई महापालिकेत उपायुक्तांचे खांदेपालट करण्यात आली असून यात शिक्षण विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव (Chanda Jadhav) यांची बदली उपायुक्त (विशेष) या पदावर करण्यात आली आली आहे. त्यामुळे उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांच्याकडे पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदाच्या भारासह उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. क विशेष म्हणजे शासना कडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या संचालक (नियोजन) डॉ प्राची जांभेकर (Dr. Prachi Jambhekar) यांची नियुक्ती उपायुक्त पदी झाल्याने त्यांच्यावर शिक्षण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आली आहे. (BMC)
मुंबई महापालिकेतील अतिरीक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) आणि उपायुक्त (विशेष)किरण दिघावकर यांनी जाहिरात धोरण बनवून याचा मसुदा बनवून लोकांच्या हरकती व सूचना याकरता संकेत स्थळावर प्रसिद्ध केला. तब्बल १४ वर्षानी जाहिरात धोरण बनवले असून त्यात डिजिटल जाहिरात याचीही मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहे. परंतु डिजिटल जाहिरात धोरण संदर्भात होर्डींग मालक संघटना यांनी सरकारच्या माध्यमातून महापालिका प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. त्यातच परवाना विभागाची जबाबदारी असणाऱ्या डॉ अश्विनी जोशी यांच्या कडून काढून घेत नव्याने आलेल्या अतिरीक्त आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्याकडे सोपवले. परंतु त्यानंतर  उपायुक्त किरण दिघावकर हे जाहिरात धोरण अंतिम करताना डिजिटल धोरण बाबत आग्रही असल्याने तसेच काही होर्डींग असोसिएशन दबाव असल्याने दिघावकर यांच्याकडील उपायुक्त विशेष या पदाची जबाबदारी काढून घेत उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडे सोपवल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.  त्यामुळे दिघावकर यांच्याकडे आता घनकचरा व्यवस्थापन विभागाची अतिरिक्त जबाबदारी ही पी /उत्तर विभागाचा सहायक आयुक्त पदाची  जबाबदारी कायम ठेवून देण्यात आली. (BMC)
संचालक(नियोजन) डॉ प्राची जांभेकर (Dr. Prachi Jambhekar) यांची प्रतिनित्युक्ती ही उपायुक्त पदी  झाल्याने त्यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जांभेकर यांच्याकडे संचालक(नियोजन) विभागाची जबाबदारी ठेवण्यात आली आहे.  तर उपायुक्त शिक्षण चंदा जाधव यांची बदली उपायुक्त (विशेष) या पदी करण्यात आली आहे. त्यामुळे चंदा जाधव जाहिरात धोरण आणि फेरीवाला निवडणूक यांचे आव्हान असेल.  (BMC)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.