दहापेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता सुशिक्षित बेरोजगार डीएड-बीएडधारकांची नेमणूक होणार आहे. त्यांना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमणुकीची (Teacher Recruitment) प्रक्रिया सुरु झाली आहे. तत्पूर्वी, कमी पटाच्या शाळांमधील दोनपैकी एका नियमित शिक्षकाची नेमणूक दुसऱ्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. त्याठिकाणी आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरतीला ब्रेक लागणार आहे.
(हेही वाचा – Oscars-2025 : ऑस्करच्या निमित्ताने वीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार जगभर आणखी जोमाने होईल – रणजित सावरकर)
इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांच्या अनेक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत. पण, स्वतंत्र विषयांचे शिक्षक विशेषत: इंग्रजी व विज्ञानाचे शिक्षक कमीच आहेत. तरीदेखील सहा ते सात वर्षानंतर यंदा जिल्हा परिषदांच्या शाळांमधील ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आणि त्यातील २० हजार पदे भरली गेली. मात्र, उर्वरित पदांसह अन्य रिक्त पदांची भरती आता कंत्राटी शिक्षक भरतीमुळे (Teacher Recruitment) थांबली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या कमी पटसंख्येच्या शाळांवर पाच हजार कंत्राटी शिक्षक नेमले जाणार असून तेथील पूर्वीचे पाच हजार शिक्षक दुसऱ्या शाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community