Swiggy IPO : अखेर स्विगीचा आयपीओ नोव्हेंबरमध्ये येणार, सेबीची आयपीओला मान्यता

Swiggy IPO : स्विगीचा आयपीओ १५ अब्ज अमेरिकन डॉलर इतका मोठा असणार आहे.

114
Swiggy IPO : अखेर स्विगीचा आयपीओ नोव्हेंबरमध्ये येणार, सेबीची आयपीओला मान्यता
  • ऋजुता लुकतुके

अन्नपदार्थ व किराणा सामान घरपोच पोहोचवणारी स्विगी ही स्टार्टअप कंपनी आपला आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. मागच्या वर्षभर या आयपीओची चर्चा सुरू होती. आता अखेर सेबीची परवानगी या आयपीओला मिळाली असून नोव्हेंबर महिन्यातच हा आयपीओ बाजारात येऊ शकतो. स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोने आपला आयपीओ आणल्यानंतर जवळ जवळ ४ वर्षांनी स्विगी आपला आयपीओ आणत आहे. (Swiggy IPO)

झोमॅटो कंपनीची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ७६ रुपयांना झाली होती. आणि आता कंपनीचा शेअर जवळ जवळ ५ पट वर चढला आहे. स्विगीची नोंदणी ही नवीन शेअर आणि ऑफर फॉर सेल या दोन्ही प्रकारात होऊ शकते. कंपनीला आपलं मूल्यांकन १५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास न्यायचं आहे. त्यामुळे हा आयपीओही मोठाच असणार आहे. काही दिवसांतच आयपीओचा रोड शो सुरू होईल. तेव्हा याविषयीची स्पष्टता येऊ शकेल. (Swiggy IPO)

(हेही वाचा – Akshay Shinde Encounter नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत पोस्टर झळकले!)

प्रोसस व्हेंचर्स, नॉरवेस्ट व्हेंचर्स आणि गोल्डमन साच या कंपन्या आपल्याकडेच काही स्विगी कंपनीचे शेअर या आयपीओ दरम्यान विकणार आहेत. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत स्विगीने कंपनीला होणारा तोटा ४३ टक्क्यांनी खाली आणला आहे. सध्या त्यांचा एकूण तोटा हा २,३४५ कोटी रुपयांचा आहे. तर महसूल ३३ टक्क्यांनी वाढला आहे. अन्नपदार्थ घरपोच देणारी सेवा, इन्स्टामार्ट आणि फूड डायनिंग या व्यवसायातून कंपनीने ३५,००० कोटींचा व्यवसाय या आर्थिक वर्षात केला आहे. (Swiggy IPO)

तर स्विगी इन्स्टामार्टचा उद्योग हा भारतात ब्लिंकइटच्या खालोखाल १,१०० कोटी रुपयांचा आहे. आयपीओमधून येणारा बहुतेक पैसा कंपनीला इन्स्टामार्ट उद्योगाच्या विस्तारासाठी वापरायचा आहे. ब्लिंक-इट, बिग बास्केट आणि झेप्टो अशा कंपन्यांशी होणाऱ्या स्पर्धेमुळे इन्स्टामार्टला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. (Swiggy IPO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.