मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महिला आणि मराठा समाजाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला होता. तर दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) मागणी विरोधात ओबीसी आरक्षण बचाव असा पवित्रा घेत उपोषणाला बसले आहेत. यामुळे जालन्यात मोठ्या प्रमाणात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. हीच बाब लक्षात घेत सदावर्ते यांनी थेट जरांगेंच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेत काय?
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता आणि त्यांच्या समर्थकांकडून शासकीय मालमत्तांचे होणारे नुकसान यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे.
तसेच महाराष्ट्रात मराठा समाजाने पुकारलेल्या बंदमुळे शाळा, महाविद्यालय आणि खाजगी आस्थापना व्यापाऱ्यांना होणारा त्रास. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मार्गदर्शक तत्व ज्यामध्ये उपोषणाची संहिता उपरोक्त बाबी लक्षात घेता महाराष्ट्र मध्ये जातीय तेढ निर्माण होणे हे थांबवावे म्हणून तातडीने मनोज जरांगे यांना उपोषणापासून मज्जाव करावा. असा थेट मुद्दा सदावर्ते यांनी याचिकेत मांडला आहे. (Manoj Jarange)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community