- प्रतिनिधी
शासनाने महानंदच्या (Mahanand) स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणाऱ्या ४६७ क्रर्मचाऱ्यांना १३८. ८४ कोटाचा निधी बुधवारी (२५ सप्टेंबर) महानंदला उपलब्ध करून दिल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महायुती सरकारने आपली वचनपुर्ती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या सहकार्याने पुन्हा महानंद ही महाराष्ट्रातील अग्रेसर दुग्धक्षेत्रातील संस्था म्हणून नावारुपाला येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – Ashok Chaudhary यांच्या पोस्टमुळे नितीश कुमार अस्वस्थ; पक्षांतर्गत नाराजी उघड)
महानंद (महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या.) मुंबई या दुग्धक्षेत्रातील सहकारी शिखर संस्थेची खालावलेली आर्थिक स्थिती विचारात घेऊन शासनाने सदर संस्थेचे पूनरूज्जीवन राष्ट्रीय स्तरावरील दुग्धक्षेत्रातील प्रख्यात संस्था राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) मार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महानंदच्या (Mahanand) विद्यमान प्रशासकाच्या जागी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB) ला प्रशासक म्हणून ५ वर्षासाठी नियुक्ती केली. तसेच महानंद पुनरूज्जीवन योजनेसाठी लागणारा एकूण २५३.७५कोटीचा निधी महानंदास भागभांडलवल म्हणून शासनाने मंजूर केला आहे.
(हेही वाचा – बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध; Akshay Shinde चा मृतदेह घरी आणणार का? वाचा सविस्तर…)
याच पुनरूज्जीवन योजनेचा एक भाग म्हणून शासनाने बुधवारी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी १३८.८४ कोटीचा निधी ४६७ महानंद कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला. सदर निर्णयामुळे महानंदच्या (Mahanand) पुनरूज्जीवन योजनेला गती प्राप्त होणार आहे. शासनाने दिलेला शब्द पाळला म्हणून महानंदाच्या सर्व स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पशुसंवर्धन मंत्री आणि महायुतीचे आभार व्यक्त केले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community