पॅरासिटामॉलसह (Paracetamol) 53 औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत. जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबाच्या औषधांशिवाय प्रतिजैविकांचाही समावेश आहे. देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CSDSO) ने त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. CSDSO च्या यादीत व्हिटॅमिन C आणि D3 टॅब्लेट शेल्कल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटिआसिड पॅन-डी, पॅरासिटामोल गोळ्या IP 500MG, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड आणि उच्च रक्तदाब औषध टेलमिसार्टन देखील क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाले.
(हेही वाचा-Akshay Shinde Encounter प्रकरणी कोर्टात काय युक्तिवाद झाला?)
बंदी असलेल्या औषधांच्या यादीमध्ये क्लोनाझेपम टॅबलेट, वेदनाशामक डायक्लोफेनाक, श्वसन रोगांसाठी वापरल्या जाणाऱ्या अँब्रोक्सोल, फंगलविरोधी फ्लुकोनाझोल आणि काही मल्टीविटामिन आणि कॅल्शियम गोळ्यांचा समावेश आहे. ही औषधे हेटेरो ड्रग्स, अल्केम लेबोरेट्रीज, हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेड (HAL), कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड यांसारख्या बड्या कंपन्या बनवतात.
CSDSO ने 53 औषधांची यादी जाहीर केली
पोटाच्या संसर्गासाठी दिले जाणारे मेट्रोनिडाझोल हे औषध हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडने तयार केले आहे, तेही या चाचणीत अपयशी ठरले आहे. त्याचप्रमाणे टोरेंट फार्मास्युटिकल्सच्या शेलकल गोळ्याही चाचणीत अपयशी झाल्या. CSDSO ने चाचणीत अयशस्वी झालेल्या 53 औषधांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी 5 औषधे बनावट होती. म्हणजेच औषध उत्पादक कंपन्यांनी सांगितले की ही त्यांची औषधे नसून त्यांच्या नावाने बनावट औषधे बाजारात विकली जात आहेत.
केसांचे उपचार, स्किनकेअर आणि अँटी-एलर्जिक औषधे देखील समाविष्ट
केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, अमायलेस, प्रोटीज, ग्लुकोअमायलेज, पेक्टिनेज, अल्फा गॅलॅक्टोसिडेस, लैक्टेज, बीटा-ग्लुकोनेज, सेल्युलेज, लिपेस, ब्रोमेलेन, झायलेनेज, हेमिसेल्युलेज, माल्ट डायस्टेस, इनव्हर्टेज आणि पॅपेन यांच्या वापरामुळे मानवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
बंदी घातलेल्या औषधांच्या यादीमध्ये केसांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे, अँटीपॅरासायटिक (परजीवींच्या प्रादुर्भावात वापरल्या जाणाऱ्या), स्किनकेअर, अँटी-ॲलर्जिक इ. सरकारने सांगितले की, या औषधांच्या जागी इतर औषधे बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community