- सुजित महामुलकर
काँग्रेसपाठोपाठ शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीसोबत उघड युद्ध पुकारले असून शरद पवार यांच्या नाराजीनंतरदेखील उबाठाने नाशिकमधील उमेदवार जाहीर केले आणि वर पवार यांना चांगलेच सुनावले.
काँग्रेसशी शीतयुद्ध सुरूच
महाविकास आघाडीतील उबाठाचे संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील शीतयुद्ध लपून राहिलेले नाही. त्यांनी एकमेकांचा पाणउतारा अनेकदा केला आहे. लोकसभेचा जागावाटप चर्चेवेळी तर राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील नेत्यांना कोणतेही अधिकार नसल्याचे’ सांगत आपण ‘थेट दिल्ली हायकमांडशी बोलत’ असल्याचे सांगून पटोले यांना टोमणे मारले. दोन दिवसांपूर्वी तर ‘काँग्रेसचे खासदार निवडून आणण्यात शिवसेना उबाठाचा मोठा वाटा आहे,’ असे सांगत लोकसभेत काँग्रेस पक्षाचा एक खासदार असताना १३ जागा निवडून आल्या त्या उबाठामुळेच, अन्यथा काँग्रेसची इतकी ताकद नाही, असा गर्भित इशाराच राऊत (Sanjay Raut) यांनी दिला.
(हेही वाचा – Oscars-2025 : ऑस्करच्या निमित्ताने वीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार जगभर आणखी जोमाने होईल – रणजित सावरकर)
पवारांशीही पंगा?
दोन-तीन दिवसांपूर्वी राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीगोंदा येथील विधानसभेचा उमेदवार परस्पर जाहीर केला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही,’ असे सांगून उबाठावरील नाराजी बोलून दाखवली. तर राऊत (Sanjay Raut) यांनी त्यालाही उत्तर देत, “शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे चुकीची माहिती आहे,’ असे सांगत ‘उबाठाची २८८ जागा लढण्याची तयारी’ असल्याचे सांगत आव्हान दिले.
उबाठाचे उमेदवार गणेश धात्रक
गेले दोन दिवस राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊत यांनी पुन्हा एक उमेदवार जाहीर करण्याचे धाडस केले. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार म्हणून उबाठाचे गणेश धात्रक यांचे नाव घोषित केले, तसेच पुढच्या वर्षी आमदार गणेश धात्रक यांचा वाढदिवस जोरात करू, असेही सभेतच जाहीर केले. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा – PM Narendra Modi गुरुवारी पुणे मेट्रोचे लोकार्पण करणार ; जाणून घ्या काय आहेत मेट्रो स्थानकाचे वैशिष्ट्ये ?)
जाहीर नाही केलं, लोकांच्या मनातलं बोलतोय
इतके करून थांबतील ते राऊत (Sanjay Raut) कसे? त्यापुढे जात राऊत (Sanjay Raut) यांनी पवारांवरही हल्लाबोल केला. शरद पवारांचे नाव न घेता “आता कुणीतरी आमचे नेते म्हणतील, तुम्ही परस्पर कसे काय उमेदवार जाहीर करता? पण मी काहीच जाहीर केलेले नाही. मी लोकांच्या मनातलं बोलतो आहे,” असे राऊत (Sanjay Raut) यांनी पवारांना (Sharad Pawar) सुनावले. तसेच ‘हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे,’ असेही ठणकावले.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हस्ते नाशिकमधील नांदगाव भागात शिवसेना उबाठाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. (Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community