MHADA Lottery 2024 : १.१३ लाख अर्जदारांनी भरली अनामत रक्कम

42
MHADA Lottery 2024 : १.१३ लाख अर्जदारांनी भरली अनामत रक्कम
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०३० सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून १,३४,३५० अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत यापैकी १,१३,८११ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. त्यामुळे या सदनिकांसाठी पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार असली तरी सद्या एका घरासाठी सुमारे ५६अर्जदारांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. (MHADA Lottery 2024)

मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात आली व अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी रात्री ११.५९ पर्यंत मुदत देण्यात आली होती. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २९ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती अर्जदारांना दाखल करता येणार आहेत. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. (MHADA Lottery 2024)

(हेही वाचा – कुर्ल्यात संभाजी ब्रिगेड Shiv Sena UBT चा बाजार उठवणार?)

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी ९ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी ११.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णता ऑनलाइन अशा IHLMS २.० या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या सोडतीचे विभाजन तीन गटांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये १३२७ सदनिकांचा समावेश आहे तर दुसऱ्या गटामध्ये विकास नियंत्रण निमयमावली ३३ (५), (७),५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांचा समावेश आहे. तसेच तिसऱ्या गटांतर्गत मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ सदनिकांचा समावेश आहे.

उत्पन्न गट निहाय या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील एकूण ३५९ सदनिकांकरीता ५०,९९३ अर्ज सादर झाले आहेत व त्यापैकी ४७,१३४ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. अल्प उत्पन्न गटातील एकूण ६२७ सदनिकांकरीता ६१,५७१ अर्ज प्राप्त झाले आहेत व त्यापैकी ४८,७६२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. मध्यम उत्पन्न गटातील एकूण ७६८ सदनिकांकरीता १४,२९३ अर्ज सादर झाले आहेत व त्यापैकी ११,४६१ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तसेच उच्च उत्पन्न गटातील एकूण २७६ सदनिकांकरीता ७४९३ अर्ज प्राप्त झाले आहेत व त्यापैकी ६४५४ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. (MHADA Lottery 2024)

(हेही वाचा – “मला मुख्यमंत्री व्हायचंय पण…”, DCM Ajit Pawar नेमकं काय म्हणाले?)

सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांचा लाभलेला प्रतिसाद पाहता विकास नियंत्रण निमयमावली ३३ (५) अंतर्गत गटातील नेहरू नगर, कुर्ला या योजनेतील १४ सदनिकांकरीता एकूण ४०२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ३१२४ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तर ओशिवरा येथील योजनेतील एका सदनिकेकरीता एकूण ७६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ५४६ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तसेच सिद्धार्थ नगर, गोरेगाव येथील २ सदनिकांकरीता एकूण ७४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ६०२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तसेच कन्नमवार नगर, विक्रोळी (४९२) या योजनेतील २ सदनिकांकरीता एकूण ६२० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ४४६ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तसेच विकास नियंत्रण निमयमावली ३३ (७) अंतर्गत भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेअंतर्गत एका सदनिकेकरिता ५३३ अर्ज प्राप्त झाले असून यापैकी ४२२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

तसेच मुंबई मंडळातर्फे नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये शिवधाम जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी मालाड (४८६) या योजनेतील एका सदनिकेकरिता ४१९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी २९१ र्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. तसेच शिवधाम कॉम्प्लेक्स जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी मालाड (४७७) या योजनेतील ४५ सदनिकांकरीता ११,२८० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ९,५१९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. अर्जदारांच्या प्रतिसादाचा ओघ पाहता मुंबईतील परवडणाऱ्या दरातील घरांची गरज अधोरेखित होते. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ८ ऑक्टोबर, २०२४ रोजी दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात येणार आहे. (MHADA Lottery 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.