Crime News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत पोलिसांनी लावला छडा

133
Crime News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत पोलिसांनी लावला छडा
Crime News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत पोलिसांनी लावला छडा

अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे ४० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुद्देमाल, टोळीतील म्होरक्या देवीदास वाघमारे, दत्तात्रय पवार यांच्यासह आठ जणांना गजाआड केले. मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले. (Crime News)

(हेही वाचा – Mumbai Rains : सिप्झमध्ये मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू)

अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांच्या २० वर्षीय मुलाचे मंगळवार, २४ सप्टेंबरच्या सकाळी दहाच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले. आरोपींनी कार आडवी घालून मुलाला गाडीत घालून त्याचे अपहरण केले. त्यानंतर शेळके यांच्याकडे मोबाइलवरून ४० कोटींच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास मुलाला मारण्याची धमकीही दिली होती. दोन कोटी एका कारमध्ये ठेवून त्या कारचा नंबर पाठवण्यासही शेळके यांना सांगितले.

पूर्वीही केली अनेकांची फसवणूक

वाघमारे आणि पवार यांनी मुंबई पालिकेत अग्निशमन दलात नोकरभरतीमध्ये अनेक तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आठ ते दहा लाख याप्रमाणे दोन कोटी ७५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. उमेदवारांचे घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांनी शेळके यांच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला होता.

अपहरणकर्त्यांनी मागणी केल्याप्रमाणे पैसे पाठवल्यानंतर कारच्या पाठोपाठ पोलीस पाठलाग करत होते. मात्र अपहरणकर्त्यांना ‘पोलीस असल्याचा संशय आल्याने मुलगा काही वेळात परत येईल’, असे सांगितले आणि मोबाइल बंद केला. त्यातील अपहरणकर्ते खंडणीची रक्कम न घेताच निघून गेल्याने घटनेचे गांभीर्य वाढले. याचवेळी अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या मोबाइल नंबरचा तांत्रिक तपास केला. लोकेशन भिवंडीजवळील पिसे डॅमजवळ असल्याचे आढळले. निखिल लबाना याला ताब्यात घेऊन विचारणा केली. त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आणि अपहरण प्रकरणातील दहा जणांना अटक केली आहे. (Crime News)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.