कर्नाटकातील (Karnataka) भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी एक जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात (Allahabad High Court) दाखल केली आहे. या याचिकेत राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्याला शिशिर यांनी तीन महिन्यापूर्वी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी दाखल केलेल्या याचिकेत शिशिर यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हे भारतीय नाही, तर ब्रिटनचे नागरिक आहेत. त्या आधारावर त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा. त्या वेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती.
(हेही वाचा – Navi Mumbai च्या 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी)
याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले होते की, याचिकाकर्त्याने नागरिकत्व कायद्यानुसार संबंधित प्राधिकरणाकडे याची तक्रार करावी. त्यावर आता याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) ब्रिटनचे नागरिक असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. प्राधिकरणाकडे दोन वेळा तक्रार केली, पण कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे याचिका करत आहे.
यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल सूर्यभान पांडेय यांना असे निर्देश दिले आहेत की, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती सादर करावी. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारला माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community