Maharashtra Cricket Association Stadium : भारतातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट मैदानांमध्ये गहुंजे स्टेडिअमचा क्रमांक कितवा? 

Maharashtra Cricket Association Stadium : गहुंजे इथल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमची आसन क्षमता ४२,७०० इतकी आहे 

272
Maharashtra Cricket Association Stadium : भारतातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट मैदानांमध्ये गहुंजे स्टेडिअमचा क्रमांक कितवा? 
Maharashtra Cricket Association Stadium : भारतातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट मैदानांमध्ये गहुंजे स्टेडिअमचा क्रमांक कितवा? 
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीच्या गेल्यावर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील काही सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाले होते. यातीलच एक सामना होता भारत विरुद्ध बांगलादेश. मुंबईहून पुण्याला द्रूतगती महामार्गावरून जाताना वाटेत गहुंजे हे गाव लागतं. तिथेच हे स्टेडिअम उभारण्यात आलं आहे. महाराष्ट्री क्रिकेट असोसिएशनच्या पुरुष व महिला संघाचं हे होम ग्राऊंड आहे. २०१२ मध्ये या स्टेडिअमचं उद्घाटन होईपर्यंत पुणे गावातील नेहरु स्टेडिअम हे महाराष्ट्र क्रिकेटचं माहेरघर होतं. (Maharashtra Cricket Association Stadium)

(हेही वाचा- Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्या खेळाडूंना ३.२ कोटी रुपयांचं बक्षीस)

पण, या स्टेडिअमच्या उभारणीनंतर इथं सातत्याने आंतरराष्ट्रीय कसोटी तसंच एकदिवसीय सामने आणि आयपीएलचे सामनेही झाले आहेत. मधले दोन हंगाम पुणे वॉरियर्सचा संघ आयपीएलमध्ये खेळला. त्या संघाचं घरचं मैदान अर्थातच हे स्टेडिअम होतं. तर एरवीही मुंबईचे काही सामने या मैदानावर झाले आहेत. (Maharashtra Cricket Association Stadium)

पण, या स्टेडिअमची उभारणी झाली आहे ती एका वादातून. नेहरु मैदानावर सामने भरवताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि पुणे महानगरपालिका यांच्यात वाद निर्माण झाला. तिकीट विक्री आणि त्यातून मिळणारा निधी यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला. पुढे भारत विरुद्ध श्रीलंका हा सामनाच कोलकाताला बहाल करावा लागला. पुणे महानगरपालिकेनं या सामन्यासाठी स्टेडिअमला सोयी पुरवण्यात असमर्थता दाखवली. (Maharashtra Cricket Association Stadium)

(हेही वाचा- Rahul Gandhi भारतीय आहेत कि विदेशी? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा)

त्यानंतर क्रिकेट असोसिएशनने नवीन स्टेडिअम उभारणीचा निर्णय घेतला. त्यावर त्वरित अंमलबजावणीही सुरू केली. ऑक्टोबर २००७ मध्ये तेव्हाचे बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ पार पडला. बांधकामाला सुरुवात झाली. ३५ एकर जागेवर वसलेल्या या स्टेडिअमसाठी १.५ अब्ज रुपयांचा खर्च अपेक्षित होता. डिसेंबर २०१० पर्यंत ते पूर्ण होणार होतं. पण, हे काम अनेक अडचणींमुळे आणखी दोन वर्षं लांबलं. (Maharashtra Cricket Association Stadium)

शापूरजी पालनजी यांनी बांधकामाचं कंत्राट मिळवलं होतं. तर स़्टेडिअमचे वास्तूविशारद होते लंडनमधील साऊदॅम्पटन स्टेडिअमचे सर्वेसर्वा मायकेल हॉपकिन्स. (Maharashtra Cricket Association Stadium)

(हेही वाचा- Navi Mumbai च्या 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी)

स्टेडिअमच्या उद्घाटनानंतरही २०१५ मध्ये त्याला आयसीसीकडून कसोटी आयोजन करण्यासाठी परवानगी मिळाली. पहिली कसोटी या स्टेडिअमवर झाली ती फेब्रुवारी २०१७ मध्ये या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने शतक झळकावलं होतं. या मैदानावरील हे पहिलं आंतरराष्ट्रीय शतक. ऑस्ट्रेलियाने हा सामनाही ३३३ धावांनी जिंकला होता. त्यानंतर या मैदानावर २०१९ मध्ये आणखी एक कसोटी सामना पार पडला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा हा सामना होता. (Maharashtra Cricket Association Stadium)

देशात अहमदाबाद, लखनौ अशा ठिकाणी अद्ययावत आणि मोठी क्रिकेट स्टेडिअम उभी राहत असताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं हे स्टेडिअमही मागे पडत नाही. या घडीला, क्षमतेच्या निकषावर देशातील हे अकरावं मोठं स्टेडिअम आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमची आसन क्षमता १,२०,००० इतकी आहे. त्यानंतर कोलकाताचं ईडन गार्डन्स येतं. याशिवाय लखनौ, कोची आणि मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमची क्षमताही ५०,००० च्या वर आहे. त्यानंतर ४०,००० ते ५०,००० आसन क्षमता असलेल्या स्टेडिअममध्ये पुण्यातील या मैदानाचा क्रमांक लागतो. (Maharashtra Cricket Association Stadium)

(हेही वाचा- PM Narendra Modi : मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द)

स्टेडिअममध्ये ४२,७०० हजारांची आसन क्षमता आहे. मुख्य मैदानात १५ खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. पावसानंतर कमी वेळात मैदान खेळण्यायोग्य व्हावं यासाठी मैदानात तीन प्रकारच्या वाळूंचे स्तर रचण्यात आले आहेत. शिवाय त्याखाली जमिनीत वाहून जाणारी ड्रेनेज यंत्रणाही बसवण्यात आली आहे. (Maharashtra Cricket Association Stadium)

मुख्य स्टेडिअमच्या दोन बाजूंना सदस्यांसाठी असलेला पॅव्हेलिअन स्टँड आणि मीडिया स्टँड बसवण्यात आला आहे. तर एक सरावासाठीचं मैदान आणि इनडोअर क्रिकेट अकादमीही इथं आहे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या रहाण्याची सोयही इथं होऊ शकते. (Maharashtra Cricket Association Stadium)

(हेही वाचा- World Environment Health Day : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन का साजरा केला जातो?)

क्रिकेट बरोबरच इथं स्कॉश, बॅडमिंटन, जलतरण तलाव, बार, स्पा अशा सुविधाही आहेत. एकावेळी ३,५०० कार आणि १२,००० दुचाकी इथं पार्क होऊ शकतात. (Maharashtra Cricket Association Stadium)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.