राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची वरळीतील सुखदा या निवासस्थानी ईडीकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान ईडीने दुपारीच देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. सात तासाच्या चौकशीनंतर बाहेर पडलेल्या देशमुख यांनी ‘मी केंद्रीय तपास यात्रेला पूर्णपणे सहकार्य करीत आहे आणि करीत राहील’, अशी प्रतिक्रिया देशमुख पत्रकारांशी बोलताना दिली.
ईडीकडून शुक्रवारी सकाळपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु केली होती. तसेच देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ताब्यात घेऊन ईडीच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिल देशमुख हे वरळीतील सुखदा निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीकडून सुखदा निवासस्थानीच देशमुख याच्याकडे चौकशी सुरु केली, तब्ब्ल सात तास सुरु असलेल्या या चौकशीनंतर ईडीने सायंकाळी साडे सात वाजता अनिल देशमुख याची सुटका केली.
(हेही वाचा : अनिल देशमुखांच्या घरावर पुन्हा ईडीची छापेमारी )
परमबीर सिंगांनी पदावर असताना आरोप का केले नाही?
सुखदामधून बाहेर पडताच देशमुख यांना पत्रकारांनी घेराव घालून त्यांना प्रश्न विचारण्यात आले असता मी ईडीला पूर्णपणे सहकार्य केले असून यापुढे देखील करीत राहणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे, तसेच त्यांनी थेट मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधत परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले असून त्याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा करीत आहे आणि लवकरच ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी, होईल असे देशमुख यांनी म्हटले आहे. परमबीर सिंग हे पदावर असताना माझ्यावर आरोप का नाही केले, त्यांना पदावर हटवल्यानंतरच त्यांना हे खोटे आरोप करायचे सुचले का?, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. परमबीर सिंग यांची मुकेश अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात संशयास्पद भूमिका आढळून आल्यामुळे त्यांना पदावरून बाजूला करण्यात आले होते, या प्रकरणात अटक करण्यात आलेले सचिन वाझे आणि इतर पोलिस अधिकारी थेट आयुक्तांना रिपोर्टींग करायचे त्यांनी सहा पोलिस आयुक्ताना कधीच रिपोर्टींग केले नसल्यचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community