BMC : अंधेरीत नाल्यात पडून महिलेचा मृत्यू; आयुक्तांनी नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

2018
Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ
Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत बुधवारी २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी मुसळधार पावसात अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात एका महिलेचा पर्जन्य जलवाहिनीत कोसळून दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी देखील नियुक्त करण्यात आली आहे. (BMC)

(हेही वाचा – Sanjay Raut यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण ?)

या उच्चस्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ ३ चे उप आयुक्त देविदास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे उर्वरित दोन सदस्य आहेत. सीप्झ मध्ये पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ओढवला, त्या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त महोदयांनी दिले आहेत. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.