ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच विराट पहिल्या दहांतून बाहेर

रिषभ पंतने मात्र आयसीसी क्रमवारीतही पुनरागमन केलं आहे.

136
ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच विराट पहिल्या दहांतून बाहेर
ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच विराट पहिल्या दहांतून बाहेर
  • ऋजुता लुकतुके

रिषभ पंतने (Rishabh Pant) २०२२ मध्ये दुखापतीनंतर पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्यातच पुनरागमनाच्या पहिल्याच कसोटीत त्याने शतक झळकावलं आहे. या कामगिरीनंतर पंतने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही (ICC Test Ranking) पुनरागमन केलं आहे. या शतकासह तो थेट सहाव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. तर भारतीय संघातील डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालही अर्धशतकाच्या जोरावर या क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र पाच स्थानं खाली सरकून दहाव्या क्रमांकावर ढकलला गेला आहे. तर विराट कोहली पहिल्यांदाच पहिल्या दहातूंन बाहेर पडला आहे.

भारतीय संधाने आपला कसोटी हंगाम सुरू केला आहे. त्याचवेळी न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे संघही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या दोन मालिकांमुळे आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एकूण १० मोठे बदल झाले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) बाराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

(हेही वाचा – RBI Security : आरबीआयच्या सुरक्षेत निष्काळजीपणा, ११ पोलिस कॉन्स्टेबलसह कारकून निलंबित)

इंग्लंडचा जो रुट फलंदाजांमध्ये पहिला क्रमांक राखून आहे. तर यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे तिघे भारतीय फलंदाज पहिल्या दहांत आहेत. गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहने मोठी मुसंडी मारली आहे. या क्रमवारीत आता तो रविचंद्रन अश्विनच्या मागोमाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. (ICC Test Ranking)

(हेही वाचा – Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेता विदित पंतप्रधानांच्या भेटीसाठी अझरबैजानहून परतला )

अश्विन आणि बुमराह यांच्यामध्ये आता अवघ्या १७ गुणांचं अंतर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आहे. गोलंदाजीत रवींद्र जाडेजा हा आणखी एक भारतीय गोलंदाज पहिल्या दहांत आहे. रवींद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत मात्र पहिला आहे. या यादीत जाडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल हे तिघे भारतीय फिरकीपटू हे पहिल्या दहांत आहेत. अश्विन दुसऱ्या तर अक्षर पटेल सहाव्या क्रमांकावर आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.