Vivo v40e : विवोचा व्ही४०ई फोन भारतात लाँच, २८,००० रुपयांपासून सुरुवात

Vivo v40e : व्ही४० मालिकेतील या नवीन फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

136
Vivo v40e : विवोचा व्ही४०ई फोन भारतात लाँच, २८,००० रुपयांपासून सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

विवो ही चिनी कंपनी असली तरी तिचे फोन हे स्वस्तातले नसतात. आताही विवो व्ही४० सीरिज आली आहे. या फोनची किंमतही ४९,००० रुपयांपासून सुरू होत आहे. मीडियाटेक म्हणजे गेमिंससाठी कंपनीने ही सीरिज आणली आहे. आता व्ही४० ही नावाप्रमाणेच या सीरिजची चौथी पिढी आहे. यापूर्वी व्ही४० आणि व्ही ४० प्रो असे मालिकेतील दोन फोन भारतात लाँच झाले आहेत. आता त्यांच्या लोकप्रियतेनंतर कंपनीने व्ही४०ई हा थोडा किफायतशीर फोन बाजारात आणला आहे. या फोनची किंमत २८,९९९ रुपयांपासून सुरू होते. पण, यातील व्हीडिओचा दर्जा हा ४के आहे.

आधीच्या सीरिजच्या तुलनेत कंपनीने व्ही४० सीरिजमध्ये बरेच बदल केले आहेत. फोनमध्ये मोठ्या क्षमतेचा स्टिरिओ स्पीकर असेल. तर फोनला आयपी६८ रेटिंगही आहे. कारण, धूळ, माती आणि पाणी यापासून हा फोन सुरक्षित असल्याचं हे रेटिंग आहे. फोनची बॅटरी ५,५०० एमएएच क्षमतेची आहे. तसंच फास्ट चार्जिंगही ८० वॅटचं आहे. याशिवाय हा नवीन फोन ओळखला जाईल तो त्याच्या कॅमेरासाठी. कारण, यातील प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर यात ४के दर्जाचा व्हिडिओ रेकॉर्ड होई शकतो.

(हेही वाचा – RBI Security : आरबीआयच्या सुरक्षेत निष्काळजीपणा, ११ पोलिस कॉन्स्टेबलसह कारकून निलंबित)

स्नॅपड्रॅगन ७ हा तिसऱ्या पिढीचा प्रोसेसर या फोनमध्ये आहे. फोनचा एमोल्ड डिस्प्ले ६.७ इंचांचा आहे. आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्झचा आहे. फोनमधील तीनही कॅमेरे हे ५० मेगापिक्सेलचे आहेत. प्राथमिक कॅमेराबरोबरच अल्ट्रावाईड लेन्सही यात देण्यात आली आहे. आणि तिसरा कॅमेरा हा सेल्फी किंवा व्हीडिओ कॉलिंगसाठी असेल.

फीचर

विवो व्ही४०ई

विवो व्ही४०

विवो व्ही४० प्लस ५जी

रॅम/रॉम

८ जीबी/२५६ जीबी, १२ जीबी/५१२ जीबी

८ जीबी/२५६ जीबी, १२ जीबी/५१२ जीबी

८ जीबी/२५६ जीबी, १२ जीबी/५१२ जीबी

डिस्प्ले

६.७७ इंच

६.७ इंच

६.७ इंच

प्रोसेसर

ऑक्टाकोअर मीडियाटेक डिमेन्सिटी ७२००

स्नॅपड्रॅगन ७, तिसरी पिढी

मीडियाटेक ९२०० प्लस

बॅटरी

५५०० एमएएच

५,५०० एमएएच

५,५०० एमएएच

कॅमेरा

५० मेगापिक्सेल

५० मेगापिक्सेल

५० मेगापिक्सेल

ओएस/युआय

अँड्रॉईड १४, फनटच ओएस

अँड्रॉईड १४, फनटच ओएस १४

अँड्रॉईड १४, फनटच ओएस १४

किंमत (रुपयांमध्ये)

२८,९९९ पासून

३४,९९९

४९,९९९

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.