भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांची पत्नी मेधा सोमय्या आणि उबाठा गटाचे प्रवक्ते, तसेच खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या दाखल केलेल्या मानहाणीच्या यांच्याविरुद्ध माझगाव कोर्टाने (Mazgaon Court) निकाल दिला होता. संजय राऊत यांनी सोमय्या दांपत्याने शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण दिवसभर टीव्हीवर दिसायला पाहिजे म्हणून ते काहीही खोटे बोलत असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी केली. (Chandrakant Bawankule)
(हेही वाचा – Swaminarayan Mandir : अमेरिकेत हिंदू मंदिराची विटंबना; ‘हिंदूनो परत जा’ म्हणत द्वेषपूर्ण घोषणाबाजी!)
या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय आता संजय राऊत यांनी स्वीकारला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढचे पाऊल टाकले पाहिजे. आता यापुढे अशा चुका होणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. दिवसभर आपण टीव्हीवर दिसायला हवे, यासाठी रात्री काहीतरी लिहीत बसायचे आणि सकाळी टीव्हीवर येत बडबड करायची. त्यामुळे मध्यमांनी देखील अशा खोटारड्या लोकांना दाखवू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. काही लोकांचा जन्मच खोटे बोलण्यासाठी झाला असल्याची टीका देखील बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी केली आहे.
(हेही वाचा – BMC : विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास आयुक्तांची मंजुरी, पण महिना उलटला तरी परिपत्रक निघेना !)
अमित शहा यांनी मोठे उद्दिष्ट दिले
केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या मार्गदर्शनामुळे राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. संघटना आणि सरकारच्या विकास कामाच्या माध्यमातून संघटन शक्ती विकसित करण्याचा मूळ मंत्र अमित शाह यांनी दिला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. २०२९ पर्यंत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान आहेत. आणि महाराष्ट्रात देखील युतीचे सरकार आले तर येथे देखील मोठे उद्दिष्ट ठेवून अमित शहा यांनी मार्गदर्शन केले असल्याची माहिती त्यांनी दिली. (Chandrakant Bawankule)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community