Rajkot Fort : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Rajkot Fort) उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, हे पुतळा पडण्यामागील मुख्य कारण समोर आले आहे.

194
मालवण सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला. यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे यालाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला १६ पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

गंज आणि कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Rajkot Fort) तयार करताना, त्याचे डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आलेले नव्हते, याचा उल्लेख या अहवालात आहे. भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. अनेक ठिकाणी चुका होत्या. तसेच शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण या समितीने अहवालात नमूद केले आहे. गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे अहवालात म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Rajkot Fort) उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, हे मुख्य कारण समोर आले आहे. देखभाल योग्य पद्धतीने झाली नाही, त्यामुळे पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता. चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग या पुतळ्याचा करण्यात आले होते. ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला होता. त्याचे डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे हा अहवाल देण्यात आला असून, यातील प्रमुख कारण आता समोर येत आहे. दरम्यान, मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा ६० फूट उंच तलवारधारी पुतळा राज्य शासन उभारणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.