Kolkata Tram Service Discontinued : १५० वर्ष जुनी ट्राम सेवा बंद होणार; ट्राम प्रेमींचा आंदोलनाचा इशारा

99
Kolkata Tram Service Discontinued : १५० वर्ष जुनी ट्राम सेवा होणार बंद; ट्राम प्रेमींचा आंदोलनाचा इशारा
Kolkata Tram Service Discontinued : १५० वर्ष जुनी ट्राम सेवा होणार बंद; ट्राम प्रेमींचा आंदोलनाचा इशारा

पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकत्यात १५० वर्ष जुनी ट्राम सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, परिवहन मंत्री स्नेहाशीष चक्रवर्ती (Minister Snehashish Chakraborty) म्हणाले की, मैदान ते एस्प्लानेड हा हेरिटेज विभाग वगळता सरकार लवकरच ट्राम बंद (Tram Discontinued) करण्याची तयारी करत आहे. कोलकता ट्राम युजर्स असोसिएशनने (CUTA) याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.  (Kolkata Tram Service Discontinued)

ट्राम चालवण्याचा प्रश्न आता कोलकाता उच्च न्यायालयात प्रलंबित

संपूर्ण देशात कोलकाता हे एकमेव शहर आहे जिथे ट्राम सेवा चालते. परिवहन मंत्री  स्नेहाशीष चक्रवर्ती म्हणाले की, धीम्या गतीने चालणाऱ्या ट्राममुळे गर्दीच्या वेळेत रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे. तसेच कोलकत्यात रस्त्यांचा भाग हा फक्त सहा टक्के इतकाच आहे. अशा स्थितीत ट्राम आणि वाहने एकत्र रस्त्यावर येत असल्याने सायंकाळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. कोलकता येथे १८७३ मध्ये घोडागाडीपासून ट्राम सेवेला सुरुवात झाल्यानंतर ट्राम सेवा ही कोलकात्याच्या वारशाचा एक भाग आहे. ट्रामने वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, ट्राम चालवण्याचा प्रश्न आता कोलकाता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पुढील सुनावणीत राज्य सरकार वरील युक्तिवाद करणार आहे. (Kolkata Tram Service Discontinued)

(हेही वाचा – Kolkata Doctor Rape and Murder Case : पोलिसांनी कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचे सीबीआयचा आरोप)

राज्य सरकारच्या या निर्णयाला कोलकता ट्राम युजर्स असोसिएशनने (Kolkata Tram Users Association) विरोध केला आहे. याबाबत आम्ही शहरातील पाच ट्राम डेपोसमोर आंदोलन करणार आहोत. आम्ही ट्राम बंद पडू देणार नाही, असे पर्यावरण कार्यकर्ते सोमेंद्र मोहन दास यांनी सांगितले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकार गंभीर असल्यास अतिक्रमणे हटवून रस्ते रुंद करू शकतात. ट्राममुळे प्रदूषण कमी होते. याशिवाय त्यांचा सरासरी वेगही कमी आहे. ट्राम वाचवण्यासाठी आम्ही या आठवड्यात आंदोलन सुरू करणार आहोत. असे दास यांनी सांगितले. 

(हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच विराट पहिल्या दहांतून बाहेर )

CUTA सदस्य कौशिक दास म्हणाले की, सरकारने डेपोमध्ये अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या ट्रामकारची दुरुस्ती आणि नियमित देखभाल केली, तर त्या ट्राम सुरळीतपणे चालवू शकतात. कोलकाता ट्राम वाचवण्यासाठी CUTA ने हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे. (Kolkata Tram Service Discontinued)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.