Ambadas Danve यांनी पलटी मारली; व्हिडिओ व्हायरल

198
Ambadas Danve यांनी पलटी मारली; व्हिडिओ व्हायरल
  • खास प्रतिनिधी 

हैदराबाद येथील २५ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि नंतर खून करणाऱ्या चार बलात्काऱ्यांना चकमकीत ठार केल्यानंतर तेलंगणा पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही बदलापूरच्या घटनेनंतर हीच अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र बदलापूरच्या चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्यानंतर दानवे यांनी पलटी मारली. दानवे यांचे २० ऑगस्ट २०२४ आणि २४ सप्टेंबर २०२४ या दिवशीच्या प्रतिक्रियांचा व्हिडिओ राज्यात समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

(हेही वाचा – Kolkata Tram Service Discontinued : १५० वर्ष जुनी ट्राम सेवा बंद होणार; ट्राम प्रेमींचा आंदोलनाचा इशारा)

डिसेंबर २०१९ मध्ये हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी चारही आरोपींना घटनास्थळी नेले असता आरोपींनी पोलिसांकडील पिस्तूल खेचून घेत पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत ते ठार झाले. दानवे (Ambadas Danve) म्हणाले, ‘मी तर म्हणतो आंध्र प्रदेश मध्ये गुन्हेगारांना जसे शूट केले अशीच शिक्षा देण्याची आवश्यकता आहे’ असे मत व्यक्त केले होते. तर अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर पोलिसांच्या चकामकीवर प्रश्न उपस्थित करण्यात दानवे यांनी पुढाकार घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.