सरकारी शाळेतील शिक्षिका आसमा आणि शगुफ्ता विद्यार्थ्यांना Namaz अदा करण्यासाठी करायच्या जबरदस्ती; शिक्षण विभागाने केले निलंबित

जिल्हा शिक्षणाधिकारी (डीईओ) अजयकुमार गुप्ता यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी समिती स्थापन केली होती. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका विमला चौहान आणि गणेशपुरा शाळेचे मुख्याध्यापक सुनील व्यास यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता.

208

राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत नमाज (Namaz) पठण करत असल्याप्रकरणी आणि मुलांना नमाज (Namaz) अदा करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका मुस्लिम शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. त्याचवेळी आणखी एका मुस्लिम शिक्षिकेवर कारवाईसाठी शिक्षण विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे. अस्मा परवीन आणि शगुफ्ता अशी ज्या दोन मुसलमान शिक्षिकेची नावे आहेत. या दोन्ही शिक्षिका बेवार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आहेत.

बेवारचे माध्यमिक शिक्षण अधिकारी अजय कुमार गुप्ता म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून बेवार शाळेतील दोन शिक्षिका विद्यार्थ्यांना नमाज  (Namaz) अदा करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारही आली होती. चौकशीअंती आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शिक्षिका अस्मा परवीन यांना निलंबित करण्यात आले. ते पुढे म्हणाले, “दुसरी शिक्षिका शगुफ्ता दुसऱ्या वर्गात असल्याने तिला तिच्या स्तरावर निलंबित केले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे शगुफ्ता यांच्यावर कारवाईसाठी अहवाल सहसंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत शाळा प्रशासनाने दोन्ही शिक्षिकांना अनेकदा सूचना दिल्या होत्या, मात्र दोन्ही शिक्षिकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा Israel Lebanon Hezbollah War : लेबनॉनमध्ये ७०० लोकांचा मृत्यू; भारतीयांसाठी नवी अधिसूचना जारी)

तक्रार केल्यानंतर चौकशी समिती स्थापन केली

अखेर शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हा शिक्षणाधिकारी (डीईओ) अजयकुमार गुप्ता यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी समिती स्थापन केली होती. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका विमला चौहान आणि गणेशपुरा शाळेचे मुख्याध्यापक सुनील व्यास यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. तपासात आरोप खरे ठरले आहेत. अस्मा परवीन यांची CBEO कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना नियमानुसार ५० टक्के निर्वाह भत्ता दिला जाईल. बेवार शाळेच्या मुख्याध्यापक महेंद्र माळी यांनी सांगितले की, डीईओच्या सूचनेनुसार शिक्षिका अस्मा परवीन यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर शिक्षिका शगुफ्ता अजूनही याच शाळेत कार्यरत आहेत. याबाबत जे काही निर्देश दिले जातील त्याचे पालन केले जाईल. राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी सांगितले होते की, शिक्षक शाळा सोडून नमाज  (Namaz) अदा करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. प्रार्थना आणि पूजेच्या नावाखाली शाळेतून गायब राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.