बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला. यानंतर अक्षयवर अंत्यसंस्कार कुठे करायचे यावरूनही वाद सुरू आहे. त्याचा मृतदेह बदलापूरमध्ये दफन करण्यासाठी विरोध होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना थेट पत्र लिहीले आहे. या पत्रातून अक्षयच्या वडिलांनी अमित शहा यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. (Akshay Shinde Encounter)
पत्रात नेमकं काय?
पत्रात त्यांनी आमच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. शिवाय आमच्या वकिलाच्या जिवालाही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी या पत्रात सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळावे अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना ही पत्र पाठवत ही मागणी केली आहे. (Akshay Shinde Encounter)
अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यानंतर त्याच्या पालकांच्या जिवाला कोणा पासून धोका आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवाय त्यांची कोर्टात लावून धरणारे वकील ही कोणाच्या रडारवर आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या या पत्रावर आता गृह मंत्रालय काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे. (Akshay Shinde Encounter)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community