Sion Koliwada मध्ये झळकले बॅनर : ‘सायन कोळीवाडा जनता का आशीर्वाद…राजेश्री राजेश शिरवडकर के साथ’

2141
Sion Koliwada मध्ये झळकले बॅनर : ‘सायन कोळीवाडा जनता का आशीर्वाद...राजेश्री राजेश शिरवडकर के साथ'
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शीव कोळीवाडा (Sion Koliwada) विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आता कमीच असल्याने तसेच त्यांचे पुनर्वसन धारावी विधानसभा क्षेत्रात केले जाणार असल्याची चर्चा असतानाच आता या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे बॅनर झळकू लागले आहेत. शीव कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांचे बॅनर सध्या या संपूर्ण मतदारसंघात झळकू लागलेले आहेत. या बॅनरवर चंद्रकांता गोयल यांचे छायाचित्र मोठ्या स्वरुपात झळकताना दिसत आहे. या मतदारसंघातून पूर्वी चंद्रकांता गोयल या आमदार म्हणून निवडून जात होत्या आणि त्यानंतर महिला आमदार म्हणून निवडून जाण्याची संधी मिळावी यासाठी आगामी विधानसभेसाठी राजेश्री शिरवडकर या इच्छुक उमेदवार असल्याची चर्चा आहे. त्यातच त्यांनी नवरात्रोत्सवा निमित्ताने बॅनरबाजी करत एकप्रकारे प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण मध्य मुंबईचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांची या मतदारसंघात प्रचंड पकड आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा मतदारसंघात आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार प्रयत्न सुरू आहे. राजेश्री शिरवडकर या मतदारसंघातील माजी नगरसेविका असल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे नाव इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहे. त्यातच आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर आतापासून मतदारसंघ बांधण्यास जोरदार सुरुवात केलेली असतानाच नवरात्रोत्सवातील बॅनर हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना शीव कोळीवाडा मतदारसंघात महविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या पेक्षा सुमारे दहा हजार कमी मते मिळाली. विद्यमान आमदार यांच्यासाठी हा मतदार कठीण बनला असून पक्षाच्या सर्वेमध्येही तमिळ सेल्वन हे निवडून येणे शक्य नसल्याने या मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून तोडफोड!)

या संपूर्ण मतदारसंघात राजेश्री शिरवडकर यांचे नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. त्यावर ‘सायन कोळीवाडा (Sion Koliwada) जनतेचा बुलंद आवाज… जनतेसाठी सदैव तत्पर…. राजेश्री राजेश शिरवडकर’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या बॅनर वर ‘सायन कोळीवाडा जनता का आशीर्वाद…राजेश्री राजेश शिरवडकर के साथ… बहुत काम करने हैं, आपका आशीर्वाद चाहिए, ‘असे म्हटले आहे. ‘सायन कोळीवाडा की नयी विचारधारा, राजेश्री राजेश शिरवडकर विश्वास हमारा…’ असे म्हटले आहे. राजेश्री शिरवडकर या दोन वेळा या विधानसभा मतदारसंघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. मुंबई महापालिकेतील नगरसेविकांमधील भाजपाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी अनेकदा मुद्देसूद विषय मांडून प्रस्तावांची चिरफाड केली आहे. प्रसंगी प्रस्तावाला विरोध करून प्रशासनाला प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले होते.

या बॅनरवर सर्व नेत्याची छायाचित्रे असून सर्वात मोठ्या आकारात माजी आमदार चंद्रकांता गोयल याचे छायाचित्र झळकत आहे. भाजपाचा तिकिटावर माटुंगा विधानसभा क्षेत्रातून चंद्रकांता गोयल या १९९० आणि १९९५ मध्ये दोन वेळा निवडून गेल्या होत्या. त्यानंतर या मतदारसंघातून काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी निवडून येत होते. परंतु २००९ नंतर माटुंगा विधानसभा क्षेत्र वाढवून तो मतदारसंघ सायन कोळीवाडा (Sion Koliwada) म्हणून ओळखला जाऊ लागला. २००९ मध्ये भाजपाने मनीषा कायंदे यांना उमेदवारी दिली होती, पण काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी १८ हजार मतांनी निवडून आल्या. त्यांनतर भाजपाने तमिळ सेल्वन यांना उमेदवारी दिली आणि ते सन २०१९ पर्यंत सलग दोनदा निवडून आले. सन २०१४ मध्ये ३ हजार मतांनी निवडून येणारे सेल्वन हे २०१९ मध्ये सुमारे १४ हजार मतांनी निवडून आले. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना ६१,६१९ मते मिळाली तर महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांना ७०,९३१ मते मिळाली. म्हणजे या विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार असूनही तब्बल दहा हजारांच्या पिछाडीवर शेवाळे होते. त्यामुळे या मतदार संघातील दांडगा जनसंपर्क असल्याने जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी या मतदारसंघासाठी मार्चेंबांधणी बॅनरद्वारे आणि वस्त्यावस्त्यांना भेटी तसेच सार्वजनिक उत्सव मंडळांच्या कार्यक्रमांना भेटी देत मतदारांचा आशिर्वाद घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.