रत्नागिरीतील करबुडे बोगद्यात रेल्वे इंजिन घसरले! 

कोकण मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या नजीकच्या स्टेशनांवर थांबवण्यात आल्या होत्या. काही वेळात इंजिन रुळावर आणून हा मार्ग पूर्ववत सुरु केला.

123

रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे बोगद्यात शनिवारी, २६ जून रोजी पहाटे ४.१५ वाजता  हजरत निजामुद्दीन –  मडगाव राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरून अपघात झाला. त्यानंतर  देखभाल दुरुस्ती गाडी घटनास्थळी दाखल झाली. नंतर कोकण रेल्वे मार्ग पूर्ववत केला. यामध्ये जीवितहानी झाली नाही.

काही वेळात इंजिन रुळावर आणून हा मार्ग पूर्ववत सुरु!

हजरत निजामुद्दीन –  मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल  गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रत्नागिरीतील करबुडे बोगद्यात रुळावरून घसरून अपघात झाला. त्यामुळे कोकण रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः ठप्प झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगदयामध्ये शनिवारी, पहाटे 4.15 वाजता दरड कोसळल्याने हा अपघात झाला. त्यानंतर देखभाल दुरुस्ती आणि वैद्यकीय उपचार गाडी रत्नागिरीहून घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच रेल्वे अधिकारी दुरुस्ती पथकासह घटनास्थळी पोहोचले. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र अपघात बोगद्यात झाल्यामुळे  कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.  या  मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या नजीकच्या स्टेशनांवर थांबवण्यात आल्या होत्या. काही वेळात इंजिन रुळावर आणून हा मार्ग पूर्ववत सुरु केला. या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.