धकाधकीच्या जीवनात अनेकांची दररोजची आवश्यक झोपही पूर्ण होत नाही. त्यामुळे दिवसभरातील कामाचा उत्साहही निघून जातो. पण जर झोपणे हेच तुमचे काम बनले, तर त्याहून मोठी आनंदाची बातमी दुसरी कोणतीच नाही. बंगळुरूमधील एका महिलेने अशाच प्रकारे एका रात्रीत लाखांच्या घरात पैसे मिळवले आहेत. बंगळुरातील स्टार्टअप वेकफिटचा स्लीप इंटर्नशिप कार्यक्रम (Sleep Internship Program ) आयोजित करण्यात आला होता.
( हेही वाचा : Protection of Women from Domestic Violence Act सर्व धर्मातील महिलांना लागू)
या इंटरशिप प्रोग्रामसाठी (Sleep Internship Program ) १० लाख लोकांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१ नवोदितांना रोजगारही मिळाला. त्यातील १२ स्लीप इंटर्न पैकी साईश्वरी एक होती. साईश्वरीने ‘स्लीप चॅम्पियन’ (Sleep Champion) हा किताब जिंकला. जे झोपेला प्राधान्य देतात, त्यांच्यासाठी हा इंटर्नशिप प्रोग्राम डिजाईन करण्यात आला होता. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना रात्री दररोज किमान ८ ते ९ तासांची झोप घेणे गरजेचे होते. याव्यतिरिक्त दिवसभरात २० मिनटांची पॉवर नॅप्स (Power Naps) घेण्यासाठीही गुण दिले गेले. या स्पर्धेत साईश्वरी महिला विजेती ठरली. तरी साईश्वरीला ९ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community