मुख्यमंत्र्यांची भाजप आंदोलनावर टीका! म्हणाले, गर्दी जमवून नुसती ताकद दाखवता येते! 

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केला. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांचे कान टोचले.

140

ओबीसी आरक्षणावरून भाजपने शनिवारी, २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळते, तोच खरा नेता असतो. गर्दी करून नुसती ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.

कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार मानले. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते च नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केला. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांचे कान टोचले.

हेही वाचा : ओबीसींचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले…  )

नाती ओढून ताणून पुढे नेता येत नाही!

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. करवीर नगरीत शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सारथीच्या उपकेंद्राचे उद्घाटन होत आहे. याविषयी भावना व्यक्त करायला शब्द नाहीत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजाला वाटले असते तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

संभाजी राजेंनी मानले आभार!

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या कोल्हापूरमधील उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारचे जाहीर कौतुक केले. केवळ चर्चा न करता निर्णयही झाला, सारथी उपकेंद्राला जमीन मिळाली, त्याबद्दल ठाकरे सरकारचे कौतुक आणि आभार मानतो असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.