Sri Siddhivinayak Trust ची व्यवस्थापन समिती जाहीर; कोषाध्यक्षासह ९ सदस्यांची वर्णी

274
Sri Siddhivinayak Trust ची व्यवस्थापन समिती जाहीर; कोषाध्यक्षासह ९ सदस्यांची वर्णी
  • प्रतिनिधी

सिद्धिविनायक न्यासाच्या (Sri Siddhivinayak Trust) व्यवस्थापन समितीवर कोषाध्यक्षासह ९ सदस्यांची वर्णी लावण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने शुक्रवारी (२७ सप्टेंबर) जारी केली. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे. त्यामुळे अध्यक्ष असलेल्या आमदार सदा सरवणकर यांना तीन वर्षांची मुदतवाढ मिळणार आहे.

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होताच राजकीय उलथापालथ झाली. यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे (Sri Siddhivinayak Trust) अध्यक्ष आदेश बांदेकर यांची उचलबांगडी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांची ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली होती. आता कोषाध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली आहे. सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या व्यवस्थापन समितीवर कोषाध्यक्ष व इतर सदस्यांची २२ जानेवारी २०२१ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली होती. मात्र या समितीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या नव्याने नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Crime : बांगलादेशी पॉर्न स्टार बन्ना शेखला बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी अटक)

सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापन समिती

सदा सरवणकर – अध्यक्ष
पवनकुमार त्रिपाठी – कोषाध्यक्ष
मीना कांबळी – सदस्या
राहुल लोंढे – सदस्य
भास्कर शेट्टी – सदस्य
महेश मुदलीयार – सदस्य
गोपाळ दळवी – सदस्य
जितेंद्र राऊत – सदस्य
मनिषा तुपे – सदस्या
सुदर्शन सांगळे – सदस्य
भास्कर विचारे – सदस्य

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.