Mumbai Metro : मुंबईतील २६ मेट्रो रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्ते आणि पदपथ करणार मोकळे; टीओडी अंतर्गत अंमलबजावणीसाठी महापालिकेने नेमला सल्लागार

476
Mumbai Metro : मुंबईतील २६ मेट्रो रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्ते आणि पदपथ करणार मोकळे; टीओडी अंतर्गत अंमलबजावणीसाठी महापालिकेने नेमला सल्लागार
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई मेट्रोचे काम सध्या प्रगतीपथावर असून या मेट्रो स्थानकांच्या परिसरातील जंक्शनचे ट्रान्झीट ओरियंटेड डेव्हलपमेंट अर्थात टीओडी अन्वये आरेखन केले जाणार आहे. मुंबई मेट्रो ३ (Mumbai Metro) अंतर्गत येणाऱ्या २६ रेल्वे स्थानकांच्या क्षेत्रातील परिसरातील सुमारे ३ किलोमीटर अंतरावर जाणाऱ्या रस्त्यांचा विचार या टीओडी अंतर्गत केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून या आरेखनानुसार निवासी, व्यावसायिक आणि कार्यालयीन इमारतींमध्ये रस्त्याचे बांधकाम करणे शक्य होणार आहे. ज्याद्वारे स्थाकाकडे जाणारे प्रवेश मार्ग तसेच बाहेर पडण्याचे मार्ग हे पादचाऱ्यांसह बस, रिक्षा, टॅक्सीसह इतर वाहनांसाठी जास्ती जास्त मोकळे ठेवले जाणार आहेत.

राज्य शासनाच्या फेब्रुवारी २०२४ च्या अधिसुचनेनुसार विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ अमध्ये विनियम ३३(२३)मध्ये ट्रान्झीट ओरियंटेड डेव्हलपमेंट अर्थात टीओडी चा नव्याने समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रॅक्टिसिंग इंजिनिअर्स आर्किटेक्ट्स एँड टाऊन प्लॅनर्स असोशिएशन (इंडिया) (पिटा) यांच्या समवेत प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या उपस्थितीत बैठक पडली.

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ महिलेची पटली ओळख )

त्यानुसार महापालिकेच्या काही जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून त्यामध्ये टीओडी यशस्वीपणे राबवण्यासाठी संपूर्ण रस्त्यांचे आरेखन अर्थात मॅपिंग करणे. तसेच निवासी, व्यावसायिक आणि कार्यालयीन इमारतींचे क्षेत्रफळानुसार बांधकाम करताना त्यासाठी आवश्यक तेवढी रस्त्यांची जागा सोडणे तसेच एक वर्षांच्या कालावधीत पादचाऱ्यांना मेट्रोकडे आणि तेथून सहज दळण वळण होण्यासाठी टीओडी झोनमध्ये जास्तीत जासत पादचाऱ्यांसाठी जागा ठेवणे आदी प्रकारचा समावेश आहे.

मेट्रो रेल्वे स्थानकांच्या परिसरातील अस्तित्वात असलेल्या जमिनींच्या वापराचे सर्वेक्षण करून प्रत्येक मेट्रो स्थानक क्षेत्राच्या टीओडी झोनसाठी स्थानिक क्षेत्र विकास करणे. ज्यात प्रवेश मार्ग, बाहेर जाण्याचा मार्ग, पादचाऱ्यांची ये जा, वाहने, बस, रिक्षा, टॅक्सी यांच्यासाठीच्या मार्गाचा समावेश असेल. यासाठी महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून यासाठी टंडन अर्बन सोल्युशन या कंपनीची निवड केली आहे. यासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar ‘या’ नेत्यांचा ‘राजकीय कार्यक्रम’ करण्याच्या तयारीत)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत मेट्रो ३ (Mumbai Metro) च्या अनुषंगाने सल्लागारामार्फत मेट्रो रेल्वे स्थानकांचे आरेखन केले जाणार आहे. मेट्रो ३ स्थानकांच्या परिसरातील जास्तीत जास्त क्षेत्रफळ हे १२० हेक्टर असून किमान क्षेत्रफळ हे ८९ चौरस मीटर आहे. २६ मेट्रो स्थानकांसाठी २७७६ हेक्टर क्षेत्र जरुरी आहे. त्यामुळे जमीन वापर सर्वेक्षणाकरता सरासरी क्षेत्र हे १०६.७७ हेक्टर एवढे ग्राह्य धरण्यात आलेले आहे. मेट्रो स्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विचार करता ट्रान्झीट ओरियंटेड डेव्हलपमेंट अर्थात टीओडी मध्ये सरासरी ३ किमी रस्ते प्रति स्थानक विचारात घेण्यात आले आहे. टीओडी करता आराखडा तयार करताना महाराष्ट्र शासनाच्या महसुली अभिलेखानुसार भूमिअभिलेख नकाश हे नजिकच्या काळातील उपग्रहाकडून व हवाई छायाचित्रण उपलब्ध झालेली चित्रे अद्ययावत केली जातील. तसेच जीआयएस नकाश तयार करून त्यांचे रेखांकन करून त्यांचे वर्गीकरण करण्याच काम सल्लागारामार्फत केले जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.