नमो आरोग्य शिबिरांमार्फत BJP करणार मुंबईची बांधणी, मुंबईकरांच्या आरोग्याची घेणार काळजी

258
Haryana Assembly Election : एक्झिट पोलचे अंदाज भुईसपाट; हरियाणात भाजपाची हॅटट्रिक
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपाची (BJP) बांधणी अधिक सक्षमपणे आणि मजबूतपणे करण्यासाठी भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पुढाकार घेतला असून यासाठी संपूर्ण मुंबईत आता माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींमार्फत आरोग्य शिबिर आयोजनावर भर दिला आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये भाजपाच्यावतीने हे नमो आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहे. ही आरोग्य शिबिरे इतर शिबिरांप्रमाणे नसून या आरोग्य शिबिरांमध्ये विविध तपासण्या करून त्या ज्या रुग्णांचे आजार किंवा पुढील वैद्यकीय उपचार करण्याची जबाबदारीही उचलली जाणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत जो वैद्यकीय कक्ष सुरू केलेला आहे. त्या कक्षाच्या माध्यमातून नमो आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. समाजातील वंचिताना आरोग्य मिळावं, त्यांच्या तपासण्या व्हाव्यात, त्यांना आवश्यक ती औषधी मिळावी याकरता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यादृष्टीकोनातून मुंबईतील माजी नगरसेवकांची एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यासर्व माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

(हेही वाचा – Mumbai Metro : मुंबईतील २६ मेट्रो रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्ते आणि पदपथ करणार मोकळे; टीओडी अंतर्गत अंमलबजावणीसाठी महापालिकेने नेमला सल्लागार)

यात सर्व माजी नगरसेवकांना तसेच पदाधिकाऱ्यांना या नमो आरोग्य शिबिराकरिता जागा व टेबल व इतर व्यवस्था आपण उपलब्ध करून द्यावी अशी सूचना केली. या आरोग्य शिबिरकरिता जागा व इतर व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानंतर डॉक्टरांची टीम तसेच रक्त तपासणी संस्था व इतर वैद्यकीय सुविधा या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या माध्यमातून विशेष वैद्यकीय मदत निधी कक्षा मार्फत पुरविल्या जाणार असल्याची माहित आहे.

हे नमो आरोग्य शिबिर हे लहान ते मध्यम स्वरूपाचे असतील आणि एका दिवशी अंदाजे २०० ते २५० रुग्ण हे तपासले जातील. या तपासणीनंतर या रुग्णास काही गंभीर आजार आढळल्यास, त्याकरिता विशेष पुढील उपचार व शस्त्रक्रिया या मुंबईतील विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या अखत्यारीतील धर्मादाय व खाजगी रुग्णालयातून मोफत व सवलतीच्या दरात करून देण्यात येतील. याशिवाय शहरी विभागातील झोपडपट्टी, विशेष समुदाय व गरजू समाज घटक यांकरिता वैद्यकीय सेवा पुरविणे व त्यांच्यापर्यंत वैद्यकीय योजना व शासनाचे विविध फायदे जसे आभा कार्ड आदी पुरवण्याचे काम हे या आरोग्य शिबीरामार्फत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.