‘ब्रह्मोस एरोस्पेस’ (BrahMos Aerospace) ही देशातील अग्निवीरांसाठी (Agniveer) नोकऱ्या आरक्षित करणारी पहिली कंपनी बनली आहे. केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत सहभागी झालेल्या अग्निवीरांना ब्रह्मोस एरोस्पेसने तांत्रिक विभागात १५ टक्के, प्रशासकीय आणि सुरक्षा विभागात ५० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. ब्रह्मोस एरोस्पेस कंपनीच्या अधिकृत वेबसाईवर यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
( हेही वाचा : महिला सक्षमीकरणात बचत गटांचा मोठा वाटा – Sudhir Mungantiwar)
अग्निवीरांचा कार्यकाळ संपल्यानंतर नोकऱ्यांची सुवर्णसंधी
अग्निवीर ( Agniveer) योजना जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून वारंवार या योजनेच्या विरोधात अपप्रचार केला जात होता. योजनेमुळे अग्निवीरांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. त्यांचे भविष्य अंधारात जाईल, असे फेक नॅरेटिव्ह पसरवले जात होते. मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ब्रह्मोस एरोस्पेस कंपनीने अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर केले आहे. ज्यामध्ये तांत्रिक १५ टक्के आणि सुरक्षा विभागात ५० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे या धोरणाने विरोधाकांना चांगलीच चपराक बसली आहे. विशेष म्हणजे याआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अग्निवीरांना सरकारी कंपन्यांमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यांचा हा परिपाक असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे ब्रह्मोस एरोस्पेस?
ब्रह्मोस एरोस्पेस (BrahMos Aerospace) ही भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची NPO Mashinostroyenia यांचा संयुक्त उपक्रम आहे. ब्रह्मोस कंपनीची स्थापना १९९८ साली झाली असून मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ब्रह्मोसमध्ये नियमित रोजगाराव्यतिरिक्त, अग्निवीरांना आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्टमध्येही काम दिले जाईल, ज्यामुळे त्यांना नागरी करिअरमध्ये येण्यास वाव मिळेल. या कंपनीमध्ये ७० टक्के भारताचा आणि ३० टक्के रशियाचा हिस्सा आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community