Kamindu Mendis : श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिसची डॉन ब्रॅडमन यांच्या या विक्रमाशी बरोबरी

Kamindu Mendis : १९४९ नंतर ही कामगिरी करणारा कामिंदु पहिला फलंदाज ठरला आहे 

137
Kamindu Mendis : श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिसची डॉन ब्रॅडमन यांच्या या विक्रमाशी बरोबरी
Kamindu Mendis : श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिसची डॉन ब्रॅडमन यांच्या या विक्रमाशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके 

श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिसने (Kamindu Mendis) क्रिकेटच्या मैदानावर अशी कामगिरी केली आहे जी, विराट कोहली किंवा रोहित शर्मालाही नाही जमलेली. त्याने चक्क क्रिकेटमधील सर्वकालीन दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्याशीच बरोबरी केली आहे. १३ कसोटी डावांमध्ये १,००० धावा पूर्ण करणारा तो सर ब्रॅडमन यांच्या नंतरचा एकमेव फलंदाज आहे. १९४९ सालानंतर एखाद्या फलंदाजाने इतक्या कमी डावांमध्ये १,००० कसोटी धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

(हेही वाचा- Devendra Fadanvis: ‘देवा भाऊ’ने फोडला प्रचाराचा नारळ)

एरवी या दोघांच्या वर आणखी दोन फलंदाज आहेत. हर्बर्ट सटक्लिफ (Herbert Sutcliffe) आणि सर एव्हर्टन वीक्स (Everton Weekes) यांनी १२ कसोटी डावांमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या. (Kamindu Mendis)

 कामिंदु मेंडिस (Kamindu Mendis) पदार्पणापासून भन्नाट फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच न्यूझीलं विरुद्ध खेळताना सलग ८ कसोटीमध्ये किमान अर्धशतक करण्याचा वि्क्रम त्याने नावावर केला होता. आता न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाबाद १८२ धावा करताना त्याने कुशाल मेंडिसबरोबर शतकी भागिदारीही रचली. श्रीलंकेला ६ बाद ६०२ अशी तगडी धावसंख्या रचून दिली. पदार्पणात सलग आठ कसोटींत किमान अर्धशतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आपलं सातत्य आणि मोठी धावसंख्या रचण्याचं कौशल्य यामुळे आताच त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

(हेही वाचा- MHADA कोकण मंडळाच्या ८ हजार घरांची लॉटरी निघणार! किंमतही ठरली)

कामिंदु मेंडिसचे शेवटचे ८ कसोटी डाव, 

  • ६१ वि. ऑस्ट्रेलिया (२०२२)
  • १०२ व १६४ वि. बांगलादेश (२०२४)
  • ९२* वि, बांगलादेश (२०२४)
  • ११३ वि. इंग्लंड (२०२४)
  • ७४ वि. इंग्लंड (२०२४)
  • ६४* वि, इंग्लंड (२०२४)
  • ११४ वि. न्यूझीलंड (२०२४)
  • १८२* वि. न्यूझीलंड (२०२४) 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.