-
ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिक आणि पाठोपाठ डायमंड्स लीगच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. हरयाणाच्या सोनीपत इथं क्रीडा विद्यापीठात तो आला तेव्हा लहान मुलांनीही त्याला भेटण्यासाठी गर्दी केली होती. डायमंड्स लीगच्या अंतिम फेरीत त्याने डाव्या हाताच्या बोटाचं हाड मोडल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आताही त्याचा डावा हात प्लॅस्टरमध्ये होता.
(हेही वाचा- Mushir Khan Accident : अपघातग्रस्त मुशीर खान इराणी चषक आणि रणजीलाही मुकणार )
टोकयोमधील सुवर्ण पदकानंतर नीरजने यंदा पॅरिसमध्ये ८९.४४ मीटरची भालाफेक करत रौप्य आपल्या नावावर केलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरची भालाफेक करत पॅरिसमध्ये सुवर्ण जिंकलं. तर नीरज त्याच्या पाठोपाठ दुसरा आला. नीरजला अजूनही ९० मीटरची फेक करता आलेली नाही. पण, सध्या त्याला दुखापतींनीही ग्रासलं आहे. (Neeraj Chopra)
#WATCH | Haryana: Ace javelin thrower Neeraj Chopra was welcomed at the Sports University of Haryana in Sonipat’s Rai pic.twitter.com/m0jsR5owFQ
— ANI (@ANI) September 27, 2024
पॅरिस ऑलिम्पिकमधील यशानंतर नीरज युरोपमध्येच राहिला होता. तो नंतर दोन डायमंड्स लीगच्या स्पर्धा खेळला. तिथेही रौप्य पदकाची कमाई करत तो लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला. तिथेही ८७.८६ मीटरची फेक करत त्याने रौप्य आपल्या नावावर केलं. अँडरसन पीटर्सपेक्षा त्याचा भाला फक्त ०.०१ सेंटिमीटरनी मागे पडला. नीरजला सध्या हाताला आणि जांघेच्या स्नायूला झालेली दुखापत बरी करायची आहे. त्यानंतर नवीन हंगामाला सामोरं जायला तो तयार होईल. (Neeraj Chopra)
(हेही वाचा- MHADA कोकण मंडळाच्या ८ हजार घरांची लॉटरी निघणार! किंमतही ठरली)
‘२०२४ हंगाम संपत असताना मला बरंच काही शिकवून गेला आहे. कामगिरीत सुधारण, चुका, पचवलेले पराभव असं सगळं काही या हंगामात होतं. त्यातूनच मी शिकणार आहे,’ असं नीरजचं या हंगामाविषयी म्हणणं आहे. (Neeraj Chopra)
#WATCH | Haryana: Ace javelin thrower Neeraj Chopra says, “It always feels good to come here… I wanted to come here and discuss how we can increase the no. of medals…” pic.twitter.com/b3njA5Urgx
— ANI (@ANI) September 27, 2024
नवीन हंगामात नीरजचं लक्ष्य असेल ते आधीच्या दुखापतीतून पूर्ण बरं होण्याचं. त्यानंतर ९० मीटरच्या भालाफेकीचं उद्दिष्टं साध्य करण्याचं. (Neeraj Chopra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community