दहा दिवसांत तलावांत वाढला ५३ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा 

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा भातसा, विहार, तुळशी आदी धरणांमधून दरदिवशी ३,८०० दशलक्ष लिटर म्हणजे ३८० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

135

जून महिन्याच्या प्रारंभीच्या आठवड्यात मुंबईसह विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची बरसात झाल्याने मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सर्व तलाव तथा धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढलेला पाहायला मिळत आहे. मागील दहा दिवसांमध्येच तब्बल ५३ हजार २११ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे १४ ते १५ दिवसांचा पाणीसाठा यामुळे वाढलेला असून एकूण पाणी पुरवठ्याच्या तुलनेत हा साठा केवळ १६ ते १७ टक्के एवढाचा आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये पडणाऱ्या पावसावर मुंबईकरांची तहान किती भागवली जाईल याचे भविष्य अवलंबून आहे.

२६ जून रोजी २ लाख ३५ हजार १४१ एवढा एकूण पाणीसाठा   

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते.  त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा भातसा, विहार, तुळशी आदी धरणांमधून दरदिवशी ३,८०० दशलक्ष लिटर म्हणजे ३८० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जून महिन्यात या सर्व तलावांमधील पाण्याची पातळी कमी झाली होती. परंतु जून महिन्यांच्या प्रारंभी मुसळधार पावसाची नोंद मुंबईसह  इतर जिल्ह्यांमध्ये झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ  झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे १७ जून रोजी या सर्व तलावांमध्ये १ लाख ८१ हजार ९३० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा होता, परंतु २६ जून रोजी हा एकूण पाणीसाठा २ लाख ३५ हजार १४१ एवढा झाला होता. तर २५ जून रोजी हा पाणीसाठा २ लाख २७ हजार २७५ एवढा होता. त्यामुळे एका दिवसांतच ०८ हजार दशलक्ष लिटरचा पाणीसाठा वाढला असून दहा दिवसांमध्ये तब्बल ५३ हजार दशलक्ष लिटरचा पाणीसाठा वाढल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा : मुंबईची एकूण रुग्णसंख्या घटली: ८ हजार रुग्ण बाहेरचे!)

तारखेनिहाय तलावांतील एकूण पाणीसाठा  

  • १७ जून २०२१ :  १ लाख ८१ हजार ९३० दशलक्ष लिटर
  • १८ जून २०२१ : १ लाख ८६ हजार ७१९ दशलक्ष लिटर
  • २६ जून २०२१ :  २ लाख ३५ हजार १४१ दशलक्ष लिटर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.