Hezbollah leader Hassan Nasrallah हवाई हल्ल्यात ठार, लेबनॉनला मोठा धक्का

इस्त्रायली लष्कर आयडीएफने केली मृत्यूची पुष्टी

64
Hezbollah leader Hassan Nasrallah हवाई हल्ल्यात ठार, लेबनॉनला मोठा धक्का
Hezbollah leader Hassan Nasrallah हवाई हल्ल्यात ठार, लेबनॉनला मोठा धक्का

हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह (Hezbollah leader Hassan Nasrallah) इस्त्रायली हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. इस्त्रायली लष्कर आयडीएफने हसन नसरल्लाहच्या मृत्यूबाबत पुष्टी केली आहे. इस्त्रायलच्या विध्वसंक हल्ल्यांनी लेबनॉन हादरला असताना हिजबुल्लाह प्रमुखाचा मृत्यू हा देशासाठी मोठा धोका मानला जात आहे.

(हेही वाचा : P T Usha : ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये पी टी उषाला कार्यकारिणी सदस्यांचा उपद्रव)

दरम्यान लेबनॉन आणि इस्त्रायलमध्ये (Israel Lebanon Hezbollah War) गेल्या ८ दिवसांत झालेल्या हल्ल्यांमध्ये ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हिजबुल्लाहाची ३०० हून अधिक तळ उद्धवस्त करण्यात आली असून मुख्यालयावरही हल्ला केला गेला. जिथेच नसरल्लाहा ही उपस्थित असल्याची माहिती आहे. मात्र नसरल्लाहाच्या मृत्यूला लेबनॉन आणि हिजबुल्लाह यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

आयडीएफने सांगितले की, हवाई हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहाच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर मोहम्मद अली इस्माइल आणि त्याचा सहाय्यक दहशतवादी हुसेन अहमद इस्माइल (Hussain Ahmed Ismail) ठार झाला आहे. तर मोसाद येथील मुख्यालयावरील हल्ल्यामुळे कार्यकर्तेही मारले गेले आहेत.

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.