भाजपा मित्रपक्षांना सन्मानाचीच वागणूक देतो; Sunil Tatkare यांचा दावा

42
भाजपा मित्रपक्षांना सन्मानाचीच वागणूक देतो; Sunil Tatkare यांचा दावा
भाजपा मित्रपक्षांना सन्मानाचीच वागणूक देतो; Sunil Tatkare यांचा दावा

मुंबई प्रतिनिधी

महायुतीमध्ये (Mahayuti) अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्व कमी झाल्याच्या कपोलकल्पित बातम्या गेले काही दिवस आमच्या हितचिंतकांनी देण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपा आपल्या मित्रपक्षांना सन्मानपूर्वकच वागणूक देतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी केंद्रीय समिती अध्यक्ष पदावर झालेली निवड आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांच्या टिकेतील हवाच काढून टाकली.  (Sunil Tatkare)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी (Chairman, Central Petroleum and Natural Gas Committee) शुक्रवारी निवड झाल्यानंतर शनिवारी प्रदेश कार्यालयात आले असता त्यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना मित्रपक्ष भाजपाचे भरभरून कौतुक केले. लोकसभेत मला जी समिती दिली आहे, त्या समितीची जबाबदारी फार मोठी असून त्या समितीच्या कामकाजाबद्दल आताच सांगणे योग्य नाही. कारण ही समिती लोकसभेच्या अखत्यारीत येते. मात्र या समितीचे काम योग्यरीतीने करण्याचे सातत्य माझ्याकडून ठेवले जाईल अशी ग्वाही ही तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली.

(हेही वाचा – Adani Group vs AAI : अदानी समुहाकडून विमानतळ प्राधिकरणाला मिळणार २,८०० कोटी रुपये )

राज्यात जी विविध महामंडळे आहेत त्यावर नियुक्त्यांसंदर्भात योग्य ती कार्यवाही सुरू आहे. त्यामूळे काही कारणास्तव निवड करण्यास विलंब झाला असला तरी काही दिवसातच माझ्या महत्वाच्या सहकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.  (Sunil Tatkare)

(हेही वाचा – Home Sales Down : जुलै – सप्टेंबर तिमाहीत घरांची विक्री ११ टक्क्यांनी घटली )

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे (MLA Shivaji Rao Garje), मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे (Sunil Tatkare), प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी, आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.