अलीकडेच, गुजरातमधील सोमनाथ शहरात आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये अनेक बेकायदेशीरपणे बांधलेल्या धार्मिक वास्तूही पाडल्या. पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराच्या (Jyotirlinga Somnath Temple) परिसरात विविध अतिक्रमणांवर गुजरात सरकारने आज तडाखेबंद कारवाई केली. 36 बुलडोझर, 70 ट्रॅक्टर ट्रॉली कामाला लावून सोमनाथ मंदिराच्या मागच्या परिसरातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेल्या मशीद आणि दर्ग्यांचे बांधकाम काढून टाकले. यावेळी तब्बल 1500 पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सरकारने तैनातच ठेवले होते.
सुरुवातीला अतिक्रमण विरोधी पथकाला स्थानिकांनी विरोध केला. मोठा जमाव जमा करून तिथे तणाव निर्माण केला, पण गुजरात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून 70 जणांना ताब्यात घेतले. अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाला तिथून हटविले. त्यानंतर प्रशासनाने धडक कारवाई करून सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली मशिद पाडली.
(हेही वाचा आजचा भारत घरात घुसून मारतो; पण काँग्रेस…; PM Modi यांचा हल्लाबोल; सर्जिकल स्ट्राईकला ८ वर्षे पूर्ण)
तिथे काही दर्गे देखील असेच अतिक्रमण करून बांधले होते, ते देखील उद्ध्वस्त करून टाकले. यामध्ये हाजी मंगलोरीशा पीर दर्गा, हजरत माईपुरी दर्गा, सिपे सालार दर्गा, मस्तानशा बापू दर्गा यांचा समावेश होता. सोमनाथच्या मंदिर परिसराभोवती (Jyotirlinga Somnath Temple) अतिक्रमणांचा मोठा विळखा पडला होता. तो प्रशासनाने कठोर कारवाई करत हाणून पाडला. यासाठी प्रशासनाने 36 बुलडोझर, 5 हिताची ड्रिलिंग मशीन 50 ट्रॅक्टर, 10 डंपर, 70 ट्रॅक्टर ट्रॉली कामाला लावल्या होत्या.
Join Our WhatsApp Community