-
ऋजुता लुकतुके
देशात सणासुदीचा हंगाम अगदी जवळ आला आहे. या काळात सण साजरा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. यासाठी त्यांच्यासाठी सर्वात स्वस्त, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणजे भारतीय रेल्वे. त्यामुळेच येणाऱ्या दिवसांतील प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा सणासुदीच्या काळात होणारी गर्दी हाताळण्यासाठी रेल्वेने ६ हजार विशेष गाड्या किंवा नियमित गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Indian Railway Special Trains)
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ दरम्यान लोकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही. मागणी वाढल्याने विशेष गाड्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. रेल्वे तिकिटांसाठीचा हा लढा दुर्गापूजेपासून सुरू होतो आणि छठपर्यंत चालतो. हा एक महिना भारतीय रेल्वेसाठी खूप आव्हानात्मक आहे. यंदा सणासुदीच्या काळात होणारी गर्दी हाताळण्यासाठी रेल्वेने ६ हजार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जवळपास सर्वच गाड्यांमध्ये जनरल डबे वाढवण्यात येणार आहेत. (Indian Railway Special Trains)
(हेही वाचा – एकाच घरात भाजपा किती जणांना उमेदवारी देणार?; Nilesh Rane यांच्या उमेदवारीवरून महायुतीत अडचणी)
दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ दरम्यान, अनेक रेल्वे मार्गांवर विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी तयारी केली आहे. आम्ही प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही. आतापर्यंत एकूण ५,९७५ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ४४२९ होती. यामुळे पूजेदरम्यान एक कोटीहून अधिक प्रवाशांना घरी जाण्याची सोय होणार असल्याचे ते म्हणाले. (Indian Railway Special Trains)
९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा पूजा उत्सव चालणार आहे. यावर्षी दिवाळी ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल तर छठ पूजा ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी आहे. मागणी वाढल्यास विशेष गाड्यांची संख्या आणखी वाढवता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, सणासुदीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता १०८ गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीचे अतिरिक्त डबे जोडण्याबरोबरच या श्रेणीतील १२,५०० नवीन डबे बनवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. (Indian Railway Special Trains)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community