विशेष प्रतिनिधी,मुंबई
दादर माहिम विधानसभेची जागा महाविकास आघाडीत ही उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जाणार असून या मतदार संघात उबाठा शिवसेनेकडून माजी महापौर, माजी आमदार विशाखा राऊत (MLA Vishakha Raut) आणि विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. विशाखा राऊत यांचा मातोश्रीच्या किचन कॅबिनेटपर्यंत वशिला आहे. त्यामुळे कठिण प्रसंगी या विभागात पक्षांची मजबूत बांधणी करणाऱ्या विभागप्रमुख यांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याची चर्चा आहे. परंतु राऊत यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेने सदा सरवणकर (Sada Saravankar) आणि मनसेकडून नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांना उमेदवारी दिल्यास या दोघांपैंकी एक जण बाजी मारुन जाईल, परंतु महेश सावंत यांना उमेदवारी दिल्यास या मतदा संघात काँटे की टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या मतदार संघात शिवसैनिकांच्या मते विशाखा राऊत यांच्या ऐवजी महेश सावंत यांच्याच नावाला अधिक पसंती असून पक्ष आता कुणाला उमेदवारी देते याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे. (Assembly Elections 2024)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) च्यासोबत विभाग क्रमांक १० चे विभागप्रमुख आणि आमदार सदा सरवणकर हे शिवसेनेत गेल्यामुळे या विभागाच्या रिक्तपदाची जबाबदारी कुणावर सोपवावी याचा विचार करत उध्दव ठाकरे यांनी सरवणकर यांचे कट्टर समर्थक आणि नंतर विरोधक असलेल्या माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांची विभागप्रमुखपदी ऑगस्ट २०२२मध्ये नियुक्ती केली. दादर-माहिम, वडाळा, धारावी या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी असलेल्या महेश सावंत यांनी विभागप्रमुख म्हणून आपली चांगली छाप निर्माण केली आणि शिवसेनेत प्रथमच शिवसैनिक फ्रेण्डली विभागप्रमुख अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. आजवर केवळ प्रभादेवी पुरतेच परिचित असलेले महेश सावंत यांनी माहिम, धारावी आणि वडाळ्यात शिवसैनिकांच्या भेटीगाठी तसेच त्यांचा विश्वास तसेच मनोबल वाढवून एकही शिवसैनिक शिवसेनेत जाणार नाही तर निष्ठेने उबाठा शिवसेनेत राहिल यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे प्रथमच शिवसैनिकांना मित्रासारखा विभागप्रमुख लाभल्याने एकूण या विभागात विभागप्रमुख आणि शिवसैनिकांची घट्ट मैत्री जमली गेली आहे. त्याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीत पहायला मिळाला. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांनी महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे महेश सावंत यांनी माहिम विधानसभेवर अधिक भर देवून प्रत्येक गल्ली, इमारत, मंडळ आणि वस्त्यांमध्ये पोहोचून शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाच्या मुखी भावी आमदार म्हणूनच त्यांचे नाव आहे. (Assembly Elections 2024)
माहिम विधानसभा मतदार संघातून महेश सावंत यांची दावेदारी असतानाच आता माजी महापौर, माजी आमदार, माजी महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचे नावही पुढे येत आहे. राऊत याच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस साईनाथ दुर्गे यांचेही नाव चर्चेत आहे. विशाखा राऊत सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग १९१मधून निवडून आल्यानंतर त्यांची निवड प्रथम स्थापत्य शहर समिती अध्यक्ष व त्यानंतर सभागृहनेतेपदी झाली होती . परंतु सभागृहनेतेपदी असतानाही राऊत यांना माहिम मतदार संघात फिरता येत नव्हते. पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांच्यामुळे आपल्या प्रभागाच्या बाहेरही फिरुन काम करता येत नाही अशाप्रकारची एकप्रकारची नाराजी त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. परंतु आता सदा सरवणकर हे शिवसेनेत गेल्यामुळे महिम विधानसभेत आपणच ज्येष्ठ असल्याने तसेच यापूर्वी दादरमधून आमदार म्हणून निवडून गेल्याने त्यांनी आपली दावेदारी सांगितली आहे. परंतु वशिलेबाजी राऊत या सरस असल्या तरी विभागातल संघटक काम आणि शिवसैनिकांच्या मनात मात्र महेश सावंत यांचे नाव आहे. (Assembly Elections 2024)
(हेही वाचा – “‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ फडणवीसांची चिंता करू नये…”; भाजपा नेते Praveen Darkar यांचे चोख प्रत्युत्तर)
या मतदार संघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची शिवसेनेकडून उमेदवारी पक्की असून मनसेकडून अद्यापही उमेदवाराचे नाव निश्चित केले नसले तरी नितीन सरदेसाई यांचे नाव चर्चेत आहे. परंतु मनसेने शिवसेनेची जागा असलेल्या शिवडी मतदार संघात शिवसेना नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा केली त्याप्रमाणे नितीन सरदेसाई यांच्या नावाची घोषणा करता आली असती. पंरतु या मतदार संघात मनसे निवडणूक लढवते की नितीन सरदेसाई किंवा अन्य कुणाला उमेदवारी देते याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे सदा सरवणकर यांच्या विरोधात सावंत जेवढी कडवी झुंज देवू शकतात तेवढी राऊत देऊ शकणार नाही. परंतु राऊत यांचे रश्मी ठाकरे तसेच खासदार अनिल देसाई यांच्याशी चांगले संबंध असल्याने सावंत यांच्यासमोरच आता राऊत यांचे आव्हान असल्याची चर्चा शिवसैनिकांकडून ऐकायला मिळत आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community