Virat Kohli : विराट जेव्हा बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करतो….

विराट कोहलीचा जसप्रीत बुमराहची नक्कल करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

68
Virat Kohli : विराट जेव्हा बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करतो….
Virat Kohli : विराट जेव्हा बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करतो….
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर असेल तर एकही क्षण नीरस जात नाही. सध्या कोहली भारताच्या कसोटी संघाबरोबर आहे. आणि यावेळी त्याचा जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) गोलंदाजीच्या शैलीची नक्कल करतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. भारतीय संघ गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना विराटने ही नक्कल सुरू केली. अर्थात, पहिला चेंडू बुमराहच टाकणार होता. आणि त्याचीच नक्कल विराटही करत होता. विराट बरोबरच मग रवींद्र जाडेजानेही गंमत सुरू केली.

कोहलीची (Virat Kohli) ही नक्कल पाहून चाहत्यांना हसू आवरता आले नाही. यानंतर जडेजानेही तेच केले. विराट आणि जडेजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर मैदानावर उपस्थित असलेल्या यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि सहाय्यक प्रशिक्षक टॅन डेस्कोट हे सगळं पाहून हसत होते.

(हेही वाचा – Jyotirlinga Somnath Temple परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त; 36 बुलडोझरच्या साहाय्याने केली कारवाई)

दुसरीकडे, विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीत एका अनोख्या विक्रमापासून काही धावा दूर आहे. आणखी २५ धावा केल्या तर विराटचे आंतरराष्ट्रीय २७,००० धावा पूर्ण होतील. आणि क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा क्रिकेटपटू ६०० डावांमध्ये २७ हजार धावांचा आकडा गाठेल. म्हणजेच सर्वात जलद २७,००० धावा करण्याची संधी विराटकडे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.