Mumbra Firing : मुंब्र्यातील गोळीबारात 19 वर्षांचा तरुण जखमी; आरोपी ताब्यात

259
Mumbra Firing : मुंब्र्यातील गोळीबारात 19 वर्षांचा तरुण जखमी; आरोपी ताब्यात
Mumbra Firing : मुंब्र्यातील गोळीबारात 19 वर्षांचा तरुण जखमी; आरोपी ताब्यात
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शिळडायघर (Mumbra Diaghar firing) येथे शुक्रवारी (27 सप्टेंबर) रात्री गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबार १९ वर्षाचा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार बेकायदेशीर पिस्तुल हाताळताना चुकून त्यातून गोळी सुटली आणि एका पोटात घुसली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी आणि आरोपी हे सर्व मित्र असून त्यातील तिघेजण मुंबई माहीम परिसरात राहणारे गुन्हेगार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर (Police Commissioner Uttam Kolekar) यांनी दिली. या गोळीबार प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Mumbra Firing)
मुंबईतील माहीम परिसरात राहणारे गुन्हेगार प्रवृत्तीचे तीन जण ठाणे जिल्ह्यातील शिळडायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मित्राच्या घरी शुक्रवारी रात्री जेवणासाठी आले होते. रात्री उशिरा जेवण झाल्यानंतर एकाकडे असलेली विनापरवाना पिस्तुल हाताळत होते. हे पिस्तुल हाताळत असताना अचानक पिस्तुलचा ट्रीगर दाबला गेला आणि त्यातून गोळी सुटून १९ वर्षाच्या तरुणाच्या पोटात घुसली, पोटात गोळी घुसल्याने हा तरुण जमिनीवर कोसळला. तो मृत झाल्याचे समजून चौघांपैकी दोघांनी तेथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारीना जाग आली.
या घटनेची माहिती डायघर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणाला तात्काळ उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalwa) येथे उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ या तरुणांवर शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढली असून, पुढील उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी डायघर पोलिसांनी (Diagher Police) तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. इतर दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Mumbra Firing)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.