हॉटेल ताजवरील हल्ल्याची ‘ती’ धमकी ठरली अफवा!

सातारा येथून एका १४ वर्षाच्या मुलाने फोन केल्याचे समोर आले.

162

साताऱ्यात राहणाऱ्या एका १४ वर्षाच्या मुलाने फोन करून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दोन मास्क लावलेले बंदूकधारी व्यक्ती हल्ला करणार असल्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी ताज हॉटेलचे सर्व प्रवेशद्वार तपासले असता कुठलाही संशयास्पद हालचाली आढळून आली नाही. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार असल्याचे कळवले!  

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे असणाऱ्या ताज हॉटेलच्या स्वागतकक्ष येथे असणाऱ्या दूरध्वनीवर शनिवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ताज हॉटेलच्या एका गेटमधून दोन मास्कधारी इसम बंदूक घेऊन हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार आहे, असे कळवले. २६/११ च्या हल्ल्याच्या आठवणीं ताज्या असताना या अज्ञात कॉलमुळे ताज व्यवस्थापनात कमालीची दहशत पसरली होती. ताज प्रशासनाने ताबडतोब पोलिसांना कळवून स्वतःची सुरक्षा यंत्रणेला अलर्ट केले.

(हेही वाचा : ईडीने न्यायालयात सांगितला वाझे-देशमुखांचा १०० कोटी वसुलीचा मार्ग ! )

१४ वर्षाच्या मुलाने केलेला फोन!   

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसानी हॉटेल ताजचे सर्व प्रवेशद्वार तपासले मात्र त्यांना कुठेच संशयित आढळून आले आहे नाही. हा कॉल अफवा पसरवणयासाठी केला असल्याचे समजले. दरम्यान पोलिसांनी आलेल्या कॉल तपासला असता हा कॉल सातारा येथून आल्याचे कळाले. अधिक माहिती मिळवली असता हा कॉल एका १४ वर्षाच्या मुलाने केल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.