MRF Limited Share Price : भारतातील सगळ्यात महागडा शेअर कुठला ठाऊक आहे?

एमआरएफ कंपनीचा एक शेअर घेण्यासाठीच तुम्हाला लाखो रुपये मोजावे लागतील.

30
MRF Limited Share Price : भारतातील सगळ्यात महागडा शेअर कुठला ठाऊक आहे?
MRF Limited Share Price : भारतातील सगळ्यात महागडा शेअर कुठला ठाऊक आहे?
  • ऋजुता लुकतुके

साधारणपणे एखाद्या कंपनीचा शेअर वर्षानुवर्षांच्या चांगल्या कामगिरीनंतर वर चढला तर चांगल्या कामगिरीचा मोबदला म्हणून कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देतात किंवा आहे तो शेअर विभागतात, ज्याला शेअर मार्केटच्या भाषेत स्टॉक स्प्लिट असं म्हणतात. गुंतवणूकदारांना यशातील हिस्सेदारी देणं हा एक हेतू त्यामागे असतोच. पण, दुसरा हेतू असतो तो शेअरची किंमत कृत्रिमरित्या थोडी खाली आणण्याचा. म्हणजे नवीन गुंतवणूकदारांना वाजवी दरात तो विकत घेता येतो.

रिलायन्स इंडस्ट्रीजचं याबाबतीतील उदाहरण अगदी ताजं आहे. एका शेअरची किंमत ३,००० रुपयांच्या वर गेल्यावर कंपनीने बोनस शेअर जाहीर केले आहेत. त्यामुळे सध्याच्या गुंतवणूकदारांचं नुकसान होणार नाही. आणि शेअर पुन्हा एकदा १,५०० रुपयांच्या आसपास आल्यावर नवीन गुंतवणूकदारही आकर्षित होतील. तसंच स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१६ साली आपला शेअर २००० च्या वर गेल्यावर त्याचं विभाजन केलं होतं. त्यामुळे २,००० रुपयांचा शेअर एकदम १९४ रुपयांवर आला. आणि तिथून गुंतवणूकदारांसाठी पुन्हा स्वस्त झाला. तर आधीच्या गुंतवणूकदारांना एका ऐवजी १० शेअर मिळाले. ही खरंतर कंपन्यांची नेहमीची रणनीती आहे. (MRF Limited Share Price)

(हेही वाचा – Kichen Garden शहरातील महापालिका विद्यार्थी शेती शिकले, उपनगरांतील मुले कधी शिकणार)

पण, भारतातील काही कंपन्यांची याबाबतीतील भूमिका थोडी वेगळी आहे. आपलं वेगळेपण जपण्यासाठी या कंपन्या कधीही विभाजन करत नाहीत किंवा बोनसही देत नाहीत. आणि मग त्यांच्या कामगिरीनुसार शेअर वरच जात राहतो. अशा कंपन्या अर्थातच, देशातील सगळ्यात महागडा शेअर असलेल्या कंपन्या आहेत. यात भारतात आघाडीवर असलेली कंपनी आहे एमआरएफ ही टायर कंपनी. कंपनीच्या शेअरचं राष्ट्रीय शेअर बाजारातील सध्याचं मूल्य (२८ सप्टेंबर २०२४) आहे १,४१,००० रुपये फक्त. म्हणजेच कंपनीचा एक शेअर घेण्यासाठी तुम्हाला १.४१ लाख रुपये मोजावे लागतील. (MRF Limited Share Price)

WhatsApp Image 2024 09 28 at 9.31.47 PM e1727539460423

आपलं वेगळेपण जपण्यासाठीच कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एमआरएफ ही देशातील अग्रगण्य टायर कंपनी आहे. अगदी विमानांच्या टायरची ऑर्डरही याच कंपनीला प्रामुख्याने मिळते. मद्रास रबर फॅक्टरी असं या कंपनीचं मूळ नाव आहे. कंपनीची बाजारातील कामगिरीच इतकी चोख आहे की, हा शेअर सुरुवातीपासून चढतच गेला आहे. कंपनीचा एकूण महसूल सध्या २२,७४४ कोटी रुपयांच्या घरात आहे. निव्वळ नफा १,९९२ कोटी रुपये इतका आहे. १९५० मध्ये ही कंपनी टायर उत्पादनाच्या व्यवसायात शिरली. आणि तेव्हापासून तिने मागे पाहिलेलं नाही. (MRF Limited Share Price)

के एम मामेन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने सलग काही दशकं देशातील अव्वल टायर उत्पादक कंपनी असण्याचा मान मिळवला आहे. २०१५ नंतर कंपनीने परदेशातही विस्तार केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.