विजनवासातील Priya Dutt वांद्रयात सक्रिय झाल्यास Ashish Shelar यांची आमदारकी धोक्यात  

191
विजनवासातील Priya Dutt वांद्रयात सक्रिय झाल्यास Ashish Shelar यांची आमदारकी धोक्यात  
विजनवासातील Priya Dutt वांद्रयात सक्रिय झाल्यास Ashish Shelar यांची आमदारकी धोक्यात  

येत्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे (Bandra) पश्चिम मतदार संघातून कॉँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त (Priya Dutt) यांचे नाव चर्चेत आल्याने मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार (Ashish Shelar) यांची आमदारकी धोक्यात आल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. (Priya Dutt)

कॉँग्रेस आणि शिवसेना ‘उबाठा’त रस्सीखेच

चार दिवसांपूर्वी मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा (Congress) आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी आमदार अस्लम शेख यांच्यासह प्रिया दत्त (Priya Dutt) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि विधानसभा निवडणूक लढवावी अशी गळ घातली. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात मुंबईतील जागांवरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना उबाठाला २२-२३ जागा हव्या आहेत तर कॉंग्रेस १५-१७ जागांवर अडून आहे. राष्ट्रवादीची (शप) किमान ६-७ जागांची मागणी आहे.

शेलार यांचे वर्चस्व

वांद्रे पश्चिम ही जागा पूर्वीपासून कॉंग्रेसकडे असल्याने कॉंग्रेसकडून या जागेसाठी आग्रह आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शेलार यांनी काही काळ फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केले असून भाजपाच्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत.

(हेही वाचा – Kichen Garden शहरातील महापालिका विद्यार्थी शेती शिकले, उपनगरांतील मुले कधी शिकणार)

दरम्यान, गेले काही वर्षे राजकीय विजनवासात गेलेल्या प्रिया दत्त (Priya Dutt) राजकारणात पुन्हा सक्रिय होत आहेत का? अशी चर्चा होत असतानाच पूर्वी राष्ट्रीय राजकारणात असलेल्या प्रिया आता राज्याच्या राजकारणात उतरणार का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रिया दत्त इच्छूक नाही

प्रिया दत्त या राज्याच्या राजकारणात सक्रिय होणे कठीण आहे तसेच विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा नसल्याचे एका कॉँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले. एक मात्र नक्की की, प्रिया दत्त यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक गांभीर्याने लढवली तर आशीष शेलार यांना मतदार संघ भाजपाकडे राखणे अत्यंत कठीण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉँग्रेसकडून मतदार संघ खेचून घेतला

मतदार संघाची फेररचना (delimitation) झाल्यानंतर २००९ ला निवडणूक झाली. सदया राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात असलेले तत्कालीन कॉँग्रेस उमेदवार बाबा सिद्दीकी यांनी भाजपाचे आशीष शेलार (Ashish Shelar) यांचा केवळ १,६९१ मतांनी पराभव केला होता. तर २०१४ मध्ये बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांना शेलार यांच्याकडून २६,९११ मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सिद्दीकी यांनी निवडणूक लढली नाही.

(हेही वाचा – Assembly Elections 2024 : माहिम विधानसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेत राऊत आणि सावंत यांच्यातच रस्सीखेच)

२०१९ च्या निवडणुकीत आशिष शेलार यांनी आपली घोडदौड सुरूच ठेवली. काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांचा शेलार यांनी २६,५०७ मतांनी पराभव करून विजय मिळवला. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांत येतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात भाजपाचे उज्वल निकम यांचा पराभव केला. आता माजी खासदार असलेल्या प्रिया दत्त यांना कॉँग्रेसकडून शेलार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी विनवणी केली जात आहे.

(हेही वाचा – Assembly Elections 2024 : माहिम विधानसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेत राऊत आणि सावंत यांच्यातच रस्सीखेच)

दत्त परिवाराचे मतदार संघाशी नाते

वांद्रे विधानसभा मतदार संघात हिंदू मंतदारांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारही निर्णायक ठरू शकतात, इतकी आहेत. दिवंगत अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) पाच वेळा या लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत तर प्रिया दत्त दोन वेळा (२००५ ची पोटनिवडणूक आणि २००९ लोकसभा निवडणूक) निवडून आल्या आहेत. या मतदार संघात हिंदी चित्रपट सृष्टीशी संबंधित मोठा वर्ग वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येते. दत्त कुटुंबाचा चित्रपट सृष्टीशी अत्यंत जवळचा संबंध आहे, नव्हे ते या मुख्य प्रवाहात होते. सुनील दत्त यांची पत्नी नर्गिस, मुलगा संजय दत्त हेदेखील हिंदी चित्रपट सृष्टीतील असल्याने परिसरातील मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे. यांचा लाभ प्रिया दत्त यांनाही झाला. सध्या तरी प्रिया दत्त यांनी उमेदवारीबाबत निर्णय झाला नाही. मात्र दत्त यांची ‘एंट्री’ झालीच तर शेलार यांना मतदार संघात पुन्हा कामाला लागावे लागणार, हे नक्की.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.